
वसई: दि. १०/१०/२०२२ पासून मनपा प्रभाग आय च्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा ईशारा
प्रजा सुराज्य पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब तिगोटे यांनी मनपा कार्यालयात निवेदन देत आपला निश्चय पक्का केला आहे.
प्रभाग समिती आय कार्यक्षेत्रांत अनधिकृत बाधकामांना पेव आला असून वारंवार तक्रारी येऊन सुद्धा कोणत्याही ठिकाणी कारवाई न करता अतिक्रमण अधिकारी बांधकाम धारकांना पाठिशी घालत आहेत. विशेषतः पापडी चर्च लगत फर्निचर दुकान, मुसाजी गल्लीत समोरील स्लाईडिंग दुकानांवर तळमजला + दोन मजले , आसिफ काझी यांचे सल्मा अपार्टमेंट सी ब्रीजच्या बाजूला, कोळीवाडा चर्चजवळील विकासक इम्रान भागवनीच ईमारतीच बांधकाम असे कित्येक अनधिकृत बांधकामे बेभान पद्धतीने चालू आहेत आणि काही बाधकामे पूर्ण झाली आहेत.अशा पद्धतीने
सर्व नियम धाब्यावर बसवुन अधिकारी वर्ग सुस्त झाल्याने त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी हा प्रजा सुराज्य पक्षाचा बेमुदत उपोषण करण्या चा संविधानिक पद्धतीचा मार्ग अण्णासाहेब तिगोटे यांनी अवलंबिला आहे.

