
विरार दि. १०/१०/२०२२ बहुजन समाज पार्टीचे पालघर जिल्हा प्रभारी प्राध्यापक डी. एन. खरे यांच्या कडून रिक्षा चालकांच्या मनमानी धोरणा विरोधात तक्रार सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. प्रविण बागडे यांच्याकडे करण्यात आली.
बहुजन समाज पार्टी तर्फे करण्यात आलेल्या तक्रारी चंदनसार व कातकरीपाडा येथे राहणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असल्याची विशेष तक्रार नमूद करण्यात आली.
यावेळी प्राध्यापक डी. एन. खरे यांनी आर.टी.ओ. अधिकाऱ्यांच्या निदर्शनास काही ठळक गोष्टी लक्षात आणून दिल्यात. साईनाथ नगर चे रिक्षा भाडे रु. २० असल्याने सायंकाळच्या वेळी जास्तीत जास्त रिक्षा चालक त्यांच्या फायद्यासाठी फक्त साईनाथ नगर पर्यंत रिक्षा आणून परत विरार पूर्व स्टेशनला जातात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी कोणताही रिक्षाचालक चंदनसार व कातकरीपाडा येथे प्रवाशी घेऊन जाण्यास तयार होत नाही. यामुळे प्रवाशांचे अत्यंत हाल होत आहेत. प्रवाशांना २-२ तास रिक्षाची वाट पाहावी लागत आहे, तसेच शेकडो प्रवाशी तर रिक्षाचालकांच्या मन-मानीला कंटाळून पायीच चालत जात आपले घर गाठतात. प्रवाशांच्या सर्व व्यथा डी. एन. खरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांन समोर मांडल्यात. सदर विषयावर तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी विरार पूर्व स्टेशन पासून साईनाथनगर पर्यंतचे प्रति प्रवाशी रिक्षा भाडे रु. १२, चंदनसार रु. १५ व कातकरीपाडा रु. २० असा फलक लावण्यात यावा. अशीही मागणी करण्यात आली. जणे करून सर्वच रिक्षा चालक कातकरीपाडा पर्यंत आल्यास प्रवाशांची गैरसोय होणार नाही. असेही प्राध्यापक डीएन खरे यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे नालासोपारा विधानसभा अध्यक्ष विष्णू भाऊ वाघ, आत्माराम जी पाटील, वैभव तायडे, संजय कांबळे, नईम इड्रिसी व सुमित रूके उपस्थित होते.
