
नालासोपारा :- वसई, विरार, नालासोपारा शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत व महापालिकेने विविध ठिकाणी बांधलेल्या ९४ सार्वजनिक स्वच्छतागृहांमधूनच महिलांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृहेच नाही आहेत. हि अतिशय धक्कादायक व लाजिरवाणी बाब आहे. परिसरात पुरुषांची नेहमी गर्दी असल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. महापालिकेने फक्त महिलांसाठीच स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारलेली नाहीत. यामूळे शहरांमध्ये स्वच्छतागृहे बांधण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे, परंतु याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे आणि ती स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्पीय तरतूद असताना हि वसई विरार महानगरपालिकेचा महिलांबाबत एवढा निष्काळजीपणा का?
याबाबत महिलांच्या आरोग्याचा दृष्टीने आपण स्वतः लक्ष घालुन महिलांसाठी वसई विरार तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधावी अशी मागणी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा वतिने वसई तालुका प्रमुख हर्षाली खानविलकर यांनी आयुक्तांकडे निवेदन पत्र देऊन मागणी केली आहे.