नालासोपारा :- पावसाळ्यात वीज शॉक लागू मृत्यूच्या घटना वाढतात. गेल्या दोन वर्षांतील आकडेवारीचा विचार केला तर पालघर जिल्ह्यात दोन वर्षात ४ ते ५ घटना झाल्या आहेत. यात या वर्षी विरारमध्ये एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू हा विजेने झाला आहे. यापूर्वी मृत्यू झालेल्या वारसांना व या मुलीच्या घरच्यांना चार लाखाचे अनुदान दिल्याचे महावितरणने सांगितले आहे. पावसाळ्यात नैसर्गीक आपत्तीसह वीज पडून मृत्यू होण्याच्या घटना घडत असतात. या घटना प्रामुख्याने जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात घडत असतात. मागील दोन वर्षात ४ ते ५ जणांना वीज पडून आपला जीव गमवावा लागला. केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्त‌ीच्या निकटच्या नातेवाईकास आता चार लाखांची रक्कम मिळणार आहे.

वीज पडून जिल्ह्यात ४ ते ५ जणांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यात मान्सूनच्या काळात अंगावर वीज पडून मृत्यू ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

अनेक जनावरे दगावली

नैसर्गीक आपत्तीमुळे अनेक जनावरांचाही मृत्यू झाला. यात बकरीपासून तर गायीपर्यंत सर्व प्रकारच्या जनावरांचा समावेश आहे. यासोबत कोंबड्याही मृत्यूमुखी पडल्या आहेत.

महावितरणतर्फे चार लाखांची मदत

मान्सूनच्या काळात अंगावर वीज पडून मृत्यू झालेल्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. यासाठी सरकारतर्फे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या वारसाला ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येते.

जनावराचा मृत्यू झाल्यास ३० हजार

विजेच्या धक्याने जनावरे मृत पडण्याचे प्रकार घडतात. अशा जनावरांच्या मालकांना ३ हजार रुपयांपासून ते ३० हजारपर्यंत आर्थिक मदत देण्यात येते.

अशी मिळेल नुकसान भरपाई

वीज पडून ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ५९ हजार.
१०० तर ६० टक्केपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत. वीज पडून जखमी झालेल्या व्यक्तीला एका आठवड्यापेक्षा जादा काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल असल्यास १२ हजार ७०० रुपये. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी ४ हजार ३०० रुपये इतकी मदत मिळणार आहे.

कोट

पावसाळ्यात विजेच्या खांब्यापासून दूर उभे राहावे. विजेच्या तारखाली घरे बांधू नयेत. पाळीव प्राण्यांनाही विजेचे खांब्याजवळ पाठवू किंवा चरायला नेऊ नये. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते. – महावितरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *