
संबंधित प्रकल्प तात्काळ मार्गी लावा; भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
वसई : (प्रतिनिधी) :
वसई तालुक्याचे नागरिकरण मोठ्या संख्येने वाढत चालले आहे. असेप असताना शासनाकडून मंजूर झालेले महत्वाचे प्रकल्प अद्याप शासनदरबारी धुळ खात पडले असल्याने नागरी विकासकामांचा बोजवारा उडत चालला आहे. याबाबत भाजपचे वसई-विरार शहर जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी पालघर जिल्ह्याचे पालकंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेत त्यांना वसईतील महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याचे आवाहन केले आहे.
या भेटी दरम्यान भाईंदर नायगांव दरम्यान भाईंदर खाडी वर रेल्वे पुलाला समांतर पुल. तालुक्यातील वाढती लोकसंख्या व वाढलेल्या वाहनाची संख्येमुळे वाहन कोंडीची समस्या सोडविण्याचा दृष्टीने मुख्य शहरांना जोडणारा प्रस्तावित रिंग रुट विकसित करणे व 4 रेल्वे ओव्हर ब्रिजचे बांधकाम एमएमआरडीए मार्फत कार्यान्वित करणे. क्षेत्रात प्रत्येक वर्षी पावसात उद्दभवणार्या पुर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा अनुसांगाने आयआयटी मुंबई व निरी या संस्थांनी शिफारस केल्यानुसार उपाय योजनां करण्यासाठी विशेष अनुदान उपलब्ध करून देणे. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग क्र 8 ला जोडणारे व वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे चार मार्ग, क्र 45 वाघोली सोपारा तुळींज पेल्हार रस्ता, मार्गे क्र.46 रेंज ऑफिस गोखिवरे वालिव ते महामार्ग, मार्ग क्र 47 वसई पूर्व ब्रिज ते सातीवली महामार्ग व मार्गे क्र. 83 नायगांव पूर्व रेल्वे स्थानक ते बापाणे महामर्गा पर्यंतचे हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्यामुळे त्या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीचे काम करणे तांत्रिक दृष्टीने मनपाला अडचणीचे होत आहे. त्यामुळे सदर रस्ते महापालिकेस हस्ताकरण करावे. नालासोपारा पश्चिमेकडे रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मालकीचे आगार अंदाजे 8 ते 10 एकर जागेत असून सुध्दा दिवसात केवळ 4 ते 5 बसेस बाहेर गावासाठी सोडले जात असल्यामुळे आगार हे पूर्णपणे रिकामे असते. त्यामुळे सदर आगार मनपाला भाडा वर दिल्यास महामंडळाचे उत्पन्न वाढेल व मार्केटसाठी आरक्षित जागेत कोणत्याही प्रकारची सुविधा नसलेल्या मनपाचा परिवहन डेपोतून यात्रा करणार्या नागरिकांची गैरसोयी दूर होईल व त्या जागेवर मार्केट बनवल्यास फेरीवाल्यांच्या त्रासापासून जनतेला थोडाफार दिलासा मिळेल. क्षेत्राच्या विकासासाठी मनपा,राज्य व केंद्र सरकारकडून प्राप्त निधीतून विकासकामे होत आहे परंतु मनपाकडे सक्षम अभियंत्याची कमतरतेमुळे कामे नियोजपूर्वक होत नाही तसेच कामाचा दर्जाही योग्य राखला जात नाही. त्यामुळे सक्षम अभियंताची नियुक्ती करावी. विरार पश्चिम येथे परिवहन भवन (मनपाचे मुख्यालय) व क्रिडा भवनाचे काम एक वर्षापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु सदर कामे हेतुपुरस्कर संथ गतीने चालू असल्याचे आरोप करत तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश द्यावे. नारंगी येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे विरारचे नागरिक त्रस्त आहे त्यामुळे सदर पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावे. मागील दोन महिन्यापासून विरार आरटीओ कडून वाहन धारकांना लायसेन्स, आरसी बुक इत्यादी कागदपत्रे वेळेस मिळत नाही तर सदर समस्येबाबत विरार आरटीओ यांना तातडीने तोडगा काढण्याचे आदेश देण्यात यावे. ङ्गह्या सर्व विषय संदर्भात संबंधित विभागीय अधिकार्यानं सोबत लवकरात लवकर बैठक लावून विषय मार्गी लावले जाईल असे आश्वसन पालकमंत्र्यांनी राजन नाईक यांना दिले आहे. सदर चर्चेत जिल्हाध्यक्ष सोबत संगठन महामंत्री महेंद्र पाटील, जिल्हा महामंत्री उत्तम कुमार, जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट व जिल्हा सचिव भरत भोईर उपस्थित होते.