
आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत दिव्यांगांच्या राखीव पाच टक्के निधीतून गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांगांना पेन्शन योजनेचा लाभ मिळत आहे व या पेन्शन योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अशी आपली एकमेव महानगरपालिका आहे या पेन्शन योजनेतून दिव्यांगांना आर्थिक मदतीचा आधार लागतो. गेल्या सात महिन्यांपासून दिव्यांगांची पेन्शन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली नाही तसेच दिव्यांगांना यावर्षी पेन्शन योजनेचा फॉर्म नवीन भरण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांमार्फत सांगितले जात आहे व या पेन्शन योजनेचा फॉर्म भरण्यासाठी दिव्यांगाना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे व ते कागदपत्र जमा करण्यासाठी दिव्यांगांना तहसीलदार , तसेच आपल्या शासकीय कार्यालयामध्ये लिफ्ट ची सोय नसल्याने कार्यालयाचे जिने चढ-उतार करावे लागते व त्यासाठी अनेक दिव्यांगांना याचा त्रास होत आहे. ज्या दिव्यांगांना पेन्शन योजनेचा लाभ मिळत आहे अशा दिव्यांगांचे फॉर्म दरवर्षी न भरता त्यांच्याकडून हयातीचा दाखला दोन वर्षांनी घेण्यात यावा .
तरी माननीय साहेबांना विनंती आहे की गेल्या सहा-सात महिन्यांपासून दिव्यांगांची रखडलेली पेन्शन दिवाळीच्या अगोदर दिव्यांगांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी जेणेकरून दिव्यांगांची दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी होऊ शकेल.
अशी मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांनी एका निवेदनाद्वारे वसई महानगरपालिकांचे आयुक्त यांना कळविले आहे.