
दिनांक १८ ऑक्टोबर, २०२२ रोजी मा.आयुक्त श्री.अनिलकुमार पवार व अति.आयुक्त श्री.आशिष पाटील यांचे निर्देशानुसार व उप-आयुक्त श्री.अजित मुठे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ‘जी’ वालीव अंतर्गत मौजे बापाणे हायवे, नायगाव पूर्व परिसरात असलेल्या ४७०० चौ.फुट बांबू पत्रा चॅनेलचे अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्यात आले.
प्रभाग समिती ‘जी’ वालीव सहा.आयुक्त श्रीम. धनश्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सदरील कारवाई करण्यात आली. यावेळी प्रभाग समिती ‘जी’ अतिक्रमण विभागाचे कनिष्ठ अभियंता कल्पेश कडव, विजय नडगे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
मा.आयुक्त महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात होत असलेल्या अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांवर नियमित कारवाई सुरु करण्यात आली आहे.