अश्विन सावरकर हे वसई पूर्व पट्टीतील एक अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच नागरिकांच्या तसेच दिव्यांगांच्या सतत मदतीला धावून येणारे अश्विन सावरकर यांनी गेल्या तीन चार वर्षांपासून अनेक नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. अश्विन सावरकर यांची समाजसेवेची असणारी तळमळ पाहून अनेक तरुण पिढी मध्ये तसेच नागरिकांमध्ये एक समाजसेवेची आवड निर्माण झालेली आहे.अश्विन सावरकर हे निस्वार्थपणे समाजसेवा करणारा तरुण नेता अशी त्यांची वसई पूर्वपट्टत ओळख आहे. त्यांनी कधीही कोणताही भेदभाव न करता आपल्यामुळे नागरिकांना कशी मदत करता येईल याकडे त्यांचे सतत त्यांचे सतत लक्ष असते. असे सर्वांचे लाडके अश्विन सावरकर यांनी दिवाळी निमित्ताने दिव्यांगांना फराळ तसेच दिवाळी गिफ्ट दिली असून सर्व दिव्यांगांमध्ये आनंदाचे वातावरण पसरवले आहे. कोणीही दिव्यांगांना मदत करत नाही हे लक्षात येताच अश्विन सावरकर यांनी प्रथमच वसई पूर्वपट्टीत दिव्यांगांची दिवाळी गोड केली आहे.
यावेळी भाजपाचे वसई पूर्व मंडळ अध्यक्ष अश्विन सावरकर, अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देविदास जयवंत केंगार , अमोल कसबे, रूपेश राऊत, रामवृक्ष यादव,प्रथमेश इंगोले, उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *