दाखल तर हजारो कुटुंबांची फसवणूक करणाऱ्यांवर कधी?

नालासोपारा :- दोन दिवसांपूर्वी नालासोपारा पूर्वेकडील ओसवाल नगरी येथील फटाक्यांच्या दुकानाला आग लागली होती, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. असे असले तरी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वसई विरार महापालिका आयुक्तांनी परिसरात सुरू असलेल्या सर्व फटाक्यांच्या दुकानांच्या परवानग्या तपासून बेकायदा दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याअंतर्गत १२ फटाका विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या दुकानांवर कारवाई झाली नसती तरी देखील दिवाळीनंतर ही सर्व दुकाने आपोआप बंद झाली असती. परंतु नागरिकांची सुरक्षा ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याने या कारवाईला कोणताही विरोध होता कामा नये. मात्र प्रशासनाची ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

त्यामुळे या कारवाईबाबत भाजपचे उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी वसई विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार यांना पत्र लिहून खडा सवाल विचारला आहे की, ओसवाल नगरी येथील घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरीही क्षेत्रातील सर्व फटक्याच्या दुकानांची तपासणी करून परवानगीशिवाय सुरू असलेल्या दुकानांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. परंतु मागील काही महिन्यात मनपा क्षेत्रात अवैध निर्माणमुळे अनेक घटण्येत अनेक निष्पाप नागरिकांनी आपले जीव गमावले आहे. मग तेव्हा प्रशासन अश्या प्रकारे परिसरातील सर्व अवैध निर्मात्यांच्या शोध लाऊन त्यांचा गुन्हे दाखील करण्याची मोहीम का हाती घेत नाही? आणि फक्त घटनेशी संबंधित लोकांवरच कारवाई का केली जाते?

मनपा आयुक्तांनी वसई तालुक्याची सर्व सामान्य जनतेला उत्तर द्यावा की, मनपा प्रशासनाला खरोखर नागरिकांच्या सुरक्षेची काळजी असेल तर परिसरात ३६५ दिवस बेकायदा बांधकामे करून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून, हजारो कुटुंबांची फसवणूक करून निष्पाप नागरिकांच्या जिवाशी खेळणारे बिल्डरवर अशी कारवाई का केली जात नाही? तसेच क्षेत्रातील अवैध निर्माण करणाऱ्यांना शोधून शोधून त्यांचावर गुन्हे दाखल करण्याची मोहीम कधी सुरू करणार आहे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *