
◆ कार्यक्रमास केरळचे माजी राज्यपाल कुम्मनम राजशेखरन यांची विशेष उपस्थिती
वसई: स्वामी विश्वेश्वरानंद सरस्वती यांची सप्तदी निमित्त गणेशपुरी येथील ब्रम्हपुरी नित्यानंद आश्रम येथे मोठ्याप्रमाणात महाराष्ट्रभरातून संतांची उपस्थिती होती. गणेशपुरी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या स्वागत समितीचा प्रमुख म्हणून उत्तम कुमार यांना जबाबदारी देण्यात आली होती. कार्यक्रमास विश्व हिंदू परिषदेचे करेळ मार्गदर्शक मंडळ प्रमुख स्वामी चिदानंद पुरी, बदलापूरचे ज्येष्ठ संत कृष्णानंद सरस्वती, हरिद्वारचे ज्येष्ठ संत सर्वे सर्वेक्षवारानंदा तसेच विशेष अतिथी म्हणून केरळचे भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व केरळचे माजी राज्यपाल कुम्मनम राजशेखरन, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे उपस्थित होते. कार्यक्रमास देशभरातून 25 ज्येष्ठ संत उपस्थित होते. यावेळी स्वामी विश्वेश्वरानंद सरस्वती यांची ‘यती पूजा’ (संत पूजा) करण्यात आली व त्यांच्या दीर्घायुष्य व गावच्या भल्यासाठी मेंगलुरू च्या मुकामबीका मंदिरचे प्रमुख संत डॉ. रामचंद्र आडीगा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नवचण्डिका यज्ञ’ य करण्यात आला. उपस्थित भाविकांसाठी भांडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.