शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे यांच्यावर महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खालच्या दर्जात टिका करताना आद.सुषमा अंधारे यांना “नटि” ह्या शब्दाचा उल्लेख केला आहे. गुलाबराव पाटिलांनी सुषमा अंधारे यांना संबोधून वापरलेले शब्द स्त्री विरोधी, लैंगिक भेदभाव करणारे, लैंगिक दृष्टीने अपमान करणारे, एका सन्माननीय स्त्रीची मानमर्यादा भंग करणारे आहे. आदरणीय सुषमाताई अंधारे या केवळ शिवसेनेच्या उपनेत्या नाहित तर संविधानिक व आंबेडकरी साहित्याच्या गाढ्या अभ्यासकहि आहेत. त्यामुळे समाजात त्यांची प्रतिमा उच्च स्थानी आहे. असे असतानाही त्यांच्याप्रती लैंगिक कुत्सितपणाचा भाव ठेऊन स्त्रीत्वाचा अपमान व मर्यादाभंग करणारे वक्तव्य करून गुलाबराव पाटील यांनी भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३५४ (अ) चा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात यावी. अन्यथा शिवसेना व आंबेडकरी संघटनांना सोबत घेऊन आंदोलन करू. अशा प्रकारचे पत्र दि. ६/११/२०२२ रोजी विरार पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. यावेळि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नालासोपारा विधानसभा सहसंपर्क प्रमुख महेशजी राऊत , नालासोपारा विधानसभा उपतालुका प्रमुख मनीष वैद्य, रिपाइंचे पालघर जिल्हाध्यक्ष गिरिश दिवाणजी, शिवसेनेचे बोळिंज विभाग प्रमुख विनायक नांदविकर तसेच इतर शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *