
जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा
पालघर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी पालघर यांच्या अध्यक्षतेखाली २० जुलै 2022 रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेत अपर जिल्हाधिकारी साहेब पालघर मुख्यालय जव्हार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रमुख मागण्या संदर्भातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष सदर सभेमध्ये प्रमुख 25 मागण्यासंदर्भामध्ये गहन चर्चा करण्यात आली होती. त्यावेळेस सदर मागण्या संदर्भातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब अहवाल सादर करण्याचे आदेश सन्माननीय अपर जिल्हाधिकारी पालघर मुख्यालय जव्हार यांनी दिले होते. त्या अनुषंगाने आज राष्ट्रीय पॅंथस आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अविश राऊत व कार्यकर्ते यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रमुख मागण्या संदर्भामध्ये चर्चा केली. यावेळी संघटनेचे लहानु डोबा संस्थापक सदस्य , कमलाकर माळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदिवासी विभाग , विनायक जाधव पालघर जिल्हा अध्यक्ष , संतोष कांबळे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष , विद्याताई मोरे पालघर जिल्हा महिला अध्यक्षा , , चंद्रकांत पवार जव्हार मोखाडा तालुका सहसंपर्क प्रमुख , किशोर राऊत पालघर तालुका अध्यक्ष , ईश्वर धोंडगा मोखाडा तालुका अध्यक्ष ,जीभाऊ अहिरे डहाणू तालुका अध्यक्ष , रमेश दिघा मोखाडा तालुका उपाध्यक्ष , सिराज शेख डहाणू तालुका उपाध्यक्ष , सागर राऊत वाणगाव शहर सचिव , सुदाम दामले , वाणगाव शहर सहसचिव , सोनाली जाधव वाणगाव शहर महिला अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.