विरार दि. १०/११/२०२२, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी प्राध्यापक डी. एन. खरे यांनी वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रामध्ये सी. सी. टि. व्ही. कॅमेरे बसविण्याची मागणी वसई-विरार शहर महानगरपालिका आयुक्त मा. अनिलकुमार पवार यांना पत्र देऊन केली आहे.

शहराचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने तेवढ्याच प्रमाणात गुन्हेगारी सुद्धा वाढलेली आहे. अशा वेळी गुन्हेगारीला आळा बसावा व गुन्हेगार शोधण्यात मदत व्हावी या हेतूने संपूर्ण शहरभर विविध ठिकाणी सी. सी. टि. व्ही. कॅमेरे बसविण्याची गरज असल्याचे प्रा. डी. एन. खरे यांनी सांगितले.

तसेच विरार पूर्व येथील कातकरीपाडा, कोपरी, चंदनसार, गोपचरपाडा, सहकारनगर, कारगिलनगर, नालासोपारा पूर्व येथील संतोषभावन इत्यादी ठिकाणे अति संवेदनशील असल्याने या भागा मध्ये CC टि. व्ही. कॅमेरे बसविणे अत्यंत गरजेचे असून सदरचा विषय शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अती महत्वाचा असल्याने पोलीस व महापालिका प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन गुन्हेगारी रोखण्यास सुरुवात करावी असे प्रा. डी. एन. खरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *