
वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रमाणे वसईत एका महिला दलालावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. नायगावच्या रिलायबल गार्डन येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती बुधवारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारून ३९ वर्षीय महिला दलालाला अटक केली आहे. त्याचप्रमाणे वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्ती केलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. वालीव पोलिस ठाण्यात पिटा ऍक्ट प्रमाणे महिला दलाला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.