नालासोपारा :- तुंगारेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षस्थानी रमेश जयराम घोरकना यांची बुधवारी सकाळी एकमताने निवड करण्यात आली आहे. तत्कालीन अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी नवीन चेहऱ्याना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला होता. बुधवारी सकाळी तुंगारेश्वर महादेवाच्या मंदिरात अध्यक्षपदा करिता विश्वस्त मंडळाची सभा आयोजित केली होती. त्यात रमेश घोरकना याना अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली तर कमलाकर पाटील ह्यांची सचिव पदी निवड करण्यात आली. रमेश घोरकना हे मागील तीन दशके राजकीय सामाजिक शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या सरळ व सौम्य स्वभावामुळे ते वसई तालुक्यात सुपरिचित आहेत त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे ग्रामपंचायत वालीवचे सरपंच ते वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सभापती पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे सर्वासर्व हितेंद्र ठाकूर यांनी त्यांची नियुक्ती केली होती .

मावळते अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मागील दहा वर्ष मी देवस्थानच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना अनेक लोकांनी सहकार्य केले. दानशूर लोकांच्या सहकार्याने देवस्थानचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यानंतर घोरकना यांनी सुद्धा देवस्थानच्या विकासाकरिता दानशूर तसेच राजकिय मित्र परिवार यांच्या सहकार्याने देवस्थानचा विकास चांगल्या प्रकारे करावा अशा शुभेच्छा दिल्या. देवस्थानचे सदस्य लक्ष्मण पाटील, कमलाकर पाटील, पिलांना उपस्थित होते. तसेच सदर प्रसंगी घोरकना यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी कै. गोविंद दादा पाटील ह्यांच्या मूळे आज सर्व पदांवर्ती आहे. त्यांचे स्मरण करून मावळत्या अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील तसेच सर्व देवस्थान कमिटीने देवस्थानच्या विकासाकरीता सहकार्य करण्याचे आवाहन केले.

माजी सभापती कन्हेया (बेटा) भोईर व माजी नगरसेवक मिलींद घरत, अमित धावणे ह्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष रमेश घोरकना यांना शुभेच्छा दिल्या व देवस्थानच्या विकास कामासाठी आम्ही घोरकना यांच्यासोबत राहू अशी ग्वाही दिली. सदर कार्यक्रमास परिसरातील भक्तगण तसेच देवस्थान कमिटी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *