
रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडिया गवई गटाचे पालघर जिल्हाध्यक्ष ऍड. गिरीश दिवाणजी यांनी आपल्या अनेक समर्थक पदाधिकारी यांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला आहे.
शनिवार दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी नालासोपारा येथे शिवसेनेच्या वतीने गुहागरवासीय व स्थानिक शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना पक्षाचे नेते तथा माजी मंत्री भास्कर जाधव साहेब, पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे साहेब ,रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव साहेब, जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण , पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटिल उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे , वसई विधानसभा संपर्क प्रमुख जगदीश कदम , नालासोपारा विधानसभा सहसंपर्क प्रमुख महेश राऊत तसेच आजी माजी पदाधिकारी हे उपस्थित होते.
मा. भास्कर जाधव साहेब यांनी ऍड. गिरिश दिवाणजी यांना शिवबंधन बांधून त्यांचा व त्यांच्याबरोबर उपस्थित पदाधिकारी यांचा प्रवेश करून घेतला. गिरीश दिवाणजी यांच्यासारखा संघटनकौशल्य संपन्न तसेच अभ्यासु व्यक्तिमत्वामुळे शिवसेना पक्षाला फायदा होईल यामुळे विरारमधील शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.