
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत मोफत डोळ्याची तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन अंध दुःख निवारक मंडळ वसई यांच्या सहकार्याने शिवसेना मा. उपशहरप्रमुख श्री मिलिंद चव्हाण यांनी वसई पश्चिम येथे आयोजित केले होते.
सदर शिबिरास शिवसेना माजी जिल्हाप्रमुख श्री शिरीष चव्हाण, जिल्हाप्रमुख श्री पंकज देशमुख, माजी विरोधी पक्षनेते श्री विनायक निकम, सौ किरण चेंदवणकर, तालुका प्रमुख श्री राजाराम बाबर, तालुका समन्व्यक श्री हरिश्चंद्र पाटील बोईसर विधानसभा संघटक श्री काकासाहेब मोटे ,उपशहरप्रमुख श्री सुधाकर रेडकर,सुभाष विश्वासराव,महिला आघाडी सौ जसिथा फिंच, सुलभा रेडकर, विश्वस्त मंडळाचे श्री अरुण चव्हाण, श्री भार्गव चौधरी यांनी भेट दिली.
शिबिरात भेट दिलेल्या रुग्णांपैकी ३४ रुग्णांवर मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मा. विभागप्रमुख श्री उमेश शिखरे, प्रसाद वर्तक, सुशांत धुळप, प्रतिभा ठाकूर, विभा दुबे, शीतलसिंग, गौरव घेवडे, यांनी विशेष प्रयत्न केले.