शासन निर्णयानुसार अमृत अभियान योजनेची अंमबजावणी करण्यात यावी तसेच अमृत अभियान योजनअंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी(वालीव)हद्दीतील तारकेनगर , सातीवली,आंबेडकर नगर कुवारा पाडा, मिथिला नगर, कोल्ही, या गावात लवकरात लवकर नागरिकांना तसेच दिव्यांगांच्या घरोघरी पाणी नळ कनेक्शन देण्यात यावे.अशी मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग राखीव 3% निधी नियंत्रण समिती चे पालघर जिल्हा सदस्य देविदास जयवंत केंगार यांनी वसई विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

       केंद्र शासनातर्फे लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी, स्वच्छ, शास्वत व पर्यावरणपूर्वक शहरे तयार करण्यासाठी अटल मिशन  फॉर रिज्युवेनेशन अंड ॲण्ड अर्बन  ट्रान्सफॉरमेशन (अमृत) या महत्वाकांक्षी अभियानाची घोषणा मा. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते दिनांक २५-६-२०१५ रोजी करण्यात आलेली आहे .

शहरातील रहिवाशांना पाणीपुरवठा, शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा करणे,
अमृत अभियानाची देशभरात अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आवश्यक मार्गदर्शक सूचना दिनांक २५-६-२०१५ रोजी केंद्र शासनाच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने केंद शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनानुसार अमृत अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने दिनांक १० ऑगस्ट २०१५ परिपत्रक आणि १३ ऑक्टोबर २०१५ रोजी शासन निर्णय जारी केले आहेत.केंद्र शासनाने या अभियानाअंतर्गत राज्यातील ४३ शहरांची निवड करण्यात आली आहे.
आपल्या वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती वालिव (जी )हद्दीतील तारके नगर , सातीवली , मिथिला नगर ,आंबेडकर नगर , कुवारा पाडा, कोल्ही या सदर गावामधील पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.एकीकडे रोजगाराचा प्रश्न तर एकीकडे पाण्याचा ह्या सर्वामध्ये नागरिकांना पाण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.वसई विरार महानगरपालिका प्रभाग समिती जी(वालीव)हद्दीतील तारकेनगर , सातीवली,आंबेडकर नगर कुवारा पाडा, मिथिला नगर, कोल्ही या गावामध्ये लवकरात लवकर येथील नागरिकांना ,वृध्द , दिव्यांगाना अमृत अभियान योजनेअंतर्गत लवकरात लवकर पाणी नळ कनेक्शन देण्यात यावे.अशी मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग राखीव 3% निधी नियंत्रण समिती चे पालघर जिल्हा सदस्य जिल्हाध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांनी वसई विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांना निवेदन देण्यात आले.तसेच दिव्यांगांच्या महापालिकेत भरती अनुशेष भरून काढावा, दिव्यांगाना घरपट्टी मध्ये सवलत देणे विविध समस्या बद्दल ही चर्चा करण्यात आली. ह्यावेळी अपंग जनशक्ती संस्थेचे गोपीनाथ नाक्ती , संतोष चौद्धरी ,अनंत काबरे, दिपिकेश पवार,मेरी पवार , गणेश चौधरी तसेच दिव्यांग बंधू व भगिनी उपस्थित होते.

ह्यावेळी वसई विरार महानगरपालिके च्या प्रभाग समिती जी (वालीव)हद्दीतील तारकेनगर , सातीवली,आंबेडकर नगर कुवारा पाडा, मिथिला नगर, कोल्ही या गावात लवकरात लवकर पाणी नळ कनेक्शन देण्याचे आदेश वसई विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *