वसईकर मित्रांनो आपल्याला वाटतं असेल आपल्या जमिनीचे पेपर, सातबारा, फेरफार, वैगरे वसई तहसीलदार कार्यालयात सुरक्षित असतील तर तो आपला गैरसमज आहे. हे पुढील उदाहरणाने आपल्याला लक्षात येईल.

वसईतील काही मिळकती मधील अतिशय गंभीर प्रकरणात पुढील सुनावणी व चौकशी दरम्यान त्या मिळकतीत त्रयस्थ पक्षकार (म्हणजे जामिन विक्री) होऊन अधिक गुंता निर्माण होऊ नये म्हणून दि. 31/03/2016 रोजी मा. उपविभागीय अधिकारी वसई यांच्या क्रमशा/व्हिडी /हक्कनोंद /कवि -146 आदेशा प्रमाणे संबंधित सातबाऱ्यावर त्रयस्थ पक्षकार निर्माण करणेस मनाई असा स्पष्ट उल्लेख करण्याचे आदेश करण्यात आला. त्याप्रमाणे तत्कालीन तहसीलदार यांनी संबंधित तलाठ्या मार्फत फेरफार क्र 5486 अन्वये त्रयस्थ पक्षकार मनाई आदेश संबंधित मिळकतीच्या सातबाऱ्यावर नोंद घेण्यात आली.

संबंधित प्रकरणात फेरचौकशी क्रमांक 64/2019 आज रोजी सुनावणी सुरु असून मा. तहसीलदार यांच्या कडे ती प्रलंबित असतानाही तसेच सातबाऱ्याला त्रयस्थ पक्षकार मनाई असतानाही तलाठी यांनी मनाई आदेश फेरफार दि 05/04/2016 नंतर संबंधित मिळकती बाबत झालेला खरेदी दस्त क्रं 6534/2016 दि 04/08/2016 ची नोंद सातबाऱ्याला घेण्यासाठी तलाठी यांनी फेरफार क्र 6044 दि 4/11/2022 रोजी नोंदवला आहे.

या प्रकरणात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळअधिकारी, तलाठी सर्वच सहभागी असण्याची शंका आहे. कृपया आपापले सातबारे व्यवस्थित तपासून घ्या कारण आपले सातबारे वसई महसूल विभागाच्या ताब्यात सुरक्षित नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *