पालघर दि १४ : जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ करिता ( सर्वसाधारण , आदिवासी उपाययोजना व अनुसुचित जाती योजना ) पालघरकरिता एकत्रित एकूण रु . ४३७.७६ कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे , यामध्ये TSP साठी २७६.१२ कोटी जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण , ) योजनेकरिता रु . १४ ९ .६ ९ कोटी इतका निधी मंजूर झाला असल्याचे .सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली त्यावेळी पालकमंत्री  श्री चव्हाण    हे बोलत होते

. जिल्हा परिषदेच्या वैदही वाढाण, खासदार राजेंद्र गावित सर्व श्री आमदार हितेंद्र ठाकूर, सुनील भुसारा श्रीनिवास वनगा राजेश पाटील विनोद निकोले निरंजन डावखरे जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुशील पालवे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

. १७ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्ताला मंजूर देण्यात आली जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण,विशेष घटक योजना व आदिवासी घटक कार्यक्रम सन २०२१- २२ ची अंतिम सुधारित तरतुदीस मान्यता देण्यात आली तसेच मागील वर्षी झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *