
जिल्हा परिषद पालघर येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यकारी अभियंता (ल.पा) संजय कुलकर्णी यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
इंदिरा प्रियदर्शिनी गांधी (पूर्वाश्रमीच्या नेहरू ; १९ नोव्हेंबर १९१७ – ३१ऑक्टोबर १९८४) या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. १९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत.अशा थोर व्यक्तिची जयंती आज साजरी करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.