सन २०२२ – २०२७ च्या कालावधीसाठी वसई मच्छिमार संस्थेची निवडणूक झाली. सदर निवडणूकीसाठी श्री. नाझरेथ मानकर यांच्या नेतृत्वाखाली मच्छिमार पॕनल, श्री. संजय कोळी यांच्या नेतृत्वाखाली कोळी युवा शक्ती पॕनल व श्री. व्हॕलन्टाईन मिरची यांच्या नेतृत्वाखाली वसई युवा बल अशी तीन पॕनल उभी होती व एकूण १६ जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात उभे होते.
दिनांक १९/११/२०२२ रोजी मतदान होऊन २०/११/२०२२ रोजी मतदानाचे निकाल जसे हाती लागायला लागले तसे नेमके कोणते पॕनल जिंकून येईल याचा अंदाज बांधता येत नव्हता. लोकांत उत्सुकता आणि धडधड वाढायला लागली.मतमोजणीच्या अटीतटीच्या लढाईत शेवटच्या क्षणी १५ ते १५० मताच्या फरकाने कोळी युवा शक्तीच्या पॕनलचा निसटता पराभव करुन मच्छिमार पॕनल विजयी झाले.
वसई मच्छिमार संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांमध्ये मच्छिमार पॕनलचे वॉर्ड क्रमांक ११४ चे बविआ चे सक्रिय कार्यकर्ते व समाजसेवक श्री. सतीश गमज्या हे इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण गटातून वसई मच्छिमार संस्थेचे माजी चेअरमन श्री. पास्कू पोपट व श्री.एडवीन केळीखाद्या, माजी रिटायर्ड इन्कम टॕक्स असिस्टंट कमिशनर श्री. आयझॕक नागो, ख्रिश्चन गाव पाटील श्री. नाझरेथ गोडबोले, नाखवा श्री. अभय घट्या, श्री. आग्नेल आवलू, श्री. जाॕन्सन भय्याजी, श्री. पास्कू मनभाट, श्री. रिचर्ड बुरखाव, श्री. विन्सन पोलादी, श्री. नांद्रेस मस्तान, श्री. विल्यम बुरखाव, अकाऊन्टन एक्सपर्ट श्री.डाॕमणिक कोळी हे विशेष मागास प्रवर्ग आणि महिला राखीव गटातून सौ. मिना एडवीन केळीखाद्या व सौ. रुफीना डाॕमणिक केळीखाद्या इत्यादी १६ उमेदवार हे संचालक म्हणून निवडून आले आहेत.
सदर निवडणूकीसाठी मच्छिमार पॕनलला श्री. नाझरेथ मानकर यांनी नेतृत्व करुन श्री. पिटर तुलो आणि कोळी एकता मंच, मच्छिमार नेते श्री. फिलीप मस्तान, मच्छिमार पॕनलचे अभिष्ट चिंतनारे व आपुलकीने चौकशी करणारे वकिल श्री. नोव्हेल डाबरे, वकिल श्री. स्टॕलनी फर्नांडीस, नॕशनल फिश फोरम आणि महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष श्री. लिओ कुलासो, महाराष्ट्र कृती समितीचे जनरल सेक्रेटरी श्री. किरण कोळी, माजी महापौर श्री. प्रविण शेट्टी तसेच ख्रिश्चन गावकी नाखावा तांडेल, बसीन कॕथाॕलिक बँकेचे संचालक श्री. आनंद मस्तान, वसई सागरी संस्थेचे चेअरमन श्री. दयानंद कोळी व त्यांचे संचालक मंडळ, हिंदू गावकी, श्री. सावरोक मनभाट ( शिमाव ), श्री. डेव्हिड पांबुज्या, श्री. सावरोक हेट्या, श्री. एडवीन भजन, श्री. लुद्रीक आवलू, आबेल व बावतीस कर्तन,सागरी कन्या महिला मंडळ,सर्व नाखवा आणि भागीदार, आयवा कंपनी, विशेष मेहनत घेणारे श्री. पॕट्रीक चिंबूर आणि अंतोन बुदूल व मच्छिमार पॕनलला मतदान करुन जिंकून देणारे सर्व मतदार बंधु आणि भगिनींचे मच्छिमार पॕनलतर्फे विशेष आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *