
वाडा तालुक्यातील पाली येथील संगीता सुरेश थापड यांचे घर जळाल्याने त्यांच्या घराची जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी तातडीने पाहणी करून त्वरीत थापड यांच्या कुटुंबास शबरी आवास योजनेतून घरकुल मिळावे, असे आदेश आज दिनांक २१/११/२०२२ रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी गट विकास अधिकारी व संबंधित अधिकारी यांना दिले.तसेच पीडित कुटुंबाला धान्य व आर्थिक स्वरूपात मदतही उपलब्ध केली.
थापड यांच्या कुटुंबियांनी वेळीच मदत मिळाल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आभार मानले.
कुठल्याही नैसर्गिक आपत्ती मुळे जिल्हयातील नागरिकांचे काही नुकसान झाल्यास तातडीने मदत मिळेल यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून नेहमीच प्रयत्न केले जातील,असे प्रतिपादन यावेळी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले.
यावेळी जि.प.सदस्य मिताली बागुल, राजेश मुकणे, गटविकास अधिकारी राजेंद्र खताळ, ग्रामसेवक दीपाली सांबरे, पं.स.सदस्य नरेश काळे, ग्रा.पं.सदस्य राजू शिरोताली, उपसरपंच भिवा शिंदे,
मधुकर सांबरे , मा.पं.स.सदस्यअरुण अधिकारी,
ज्येष्ठ शिवसैनिक रामचंद्र पठारे शिवसैनिक, विक्रमगड तालुका प्रमुख, सागर आळशी,
सुरेश थापड-पाली पोशेरी इ. उपस्थित होते.