
दिनांक २४ नोव्हेंबर, २०२२ रोजी मा.आयुक्त श्री.अनिलकुमार पवार व अति.आयुक्त श्री.आशिष पाटील यांचे निर्देशानुसार व उप-आयुक्त श्री.अजित मुठे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ‘एफ’ पेल्हार अंतर्गत अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
प्रभाग समिती ‘एफ’ पेल्हार मधील पेल्हार धरणाजवळील तळमजला + १ मजला आरसीसी बांधकाम केलेल्या व अंदाजे १४००० चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम श्री.अजित मुठे, उप-आयुक्त अतिक्रमण विभाग यांच्या नेतृत्वाखाली व जेसीबीच्या सहाय्याने निष्कासीत करण्यात आले. यावेळी श्री.अजित मुठे, उप-आयुक्त अतिक्रमण विभाग, कनिष्ठ अभियंता किशोर पोवार व केयूर पाटील, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
त्याचप्रमाणे एक दिवसापूर्वी पेल्हार भागातच अंदाजे १३००० चौ.फुट अनधिकृत बांधकाम सुरु असलेल्या २ इमारतींचे बांधकाम तसेच वाकणपाडा येथे २१०० चौ.फुटाचे गाळ्याचे अनधिकृत बांधकाम व २५० चौ. फुटांच्या दोन अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम प्रभाग समिती ‘एफ’ मार्फत निष्कासीत करण्यात आले आहे.
तसेच प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार मध्ये अंदाजे ५००० चौ.फुट प्लींथचे व काही रूम्सचे अनधिकृत बांधकाम प्रभाग समिती ‘सी’ चे सहा.आयुक्त श्री.गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निष्कासीत करण्यात आले. यावेळी श्री.अजित मुठे, उप-आयुक्त अतिक्रमण विभाग, सहा.आयुक्त श्री.गणेश पाटील, कनिष्ठ अभियंता अतिक्रमण विभाग, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
वरीलप्रमाणे दोन दिवसांमध्ये महानगरपालिका कार्यक्षेत्रात अंदाजे ३४००० ते ३५००० चौ.फुटांचे अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्यात आले आहे.
मा.आयुक्त महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात होत असलेल्या अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांवर नियमित कारवाई सुरु करण्यात आली आहे.

