
सिद्धार्थ नगर मध्ये बाबासाहेब पुतळ्यामागे अनाधिकृत बांधकाम
वसई (प्रतिनिधी) वसई विरार शहर महानगर पालिकेच्या हद्दीत सद्या अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. काही ठिकाणी पालिकेने बेकायदा बांधकामांना एमआर टीपी अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत मात्र पालिकेच्या आय हद्दीतील गाव मौजे सिद्धार्थ नगर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मागील बाजूस व गटारावर मागील काही दिवसांपासून बेकायदा बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम करणारे वकील आणि वसई विरार महानगर पालिकेच् कर्मचारी करीत आहे. हे बांधकाम गटारवर असल्याने आणि पुतळ्याच्या सौंदर्यस बाधा पोहचत असल्याने हे बांधकाम त्वरित बंद करावे म्हणून शेजारी राहणारी भारती जाधव आणि येथील ग्रामस्थांनी सह्यांचे निवेदन महानगर पालिकेने दिले आहे. मात्र येथे कोणतीच कारवाई केली गेलेली नाही. त्यामुळे वकील आणि मनपा कर्मचाऱ्यांना बेकायदा बांधकाम करण्याचा खास परवाना पालिकेकडून देण्यात आलेला आहे का असा सवाल ग्रामस्थां कडून विचारला जात आहे. खर तर बांधकाम सुरू होण्या अगोदर ही तक्रार करण्यात आली होती. मात्र अतिक्रमण धारकांनी सुट्टीच्या आणि रात्रीच्या काळात हळू हळू आपले काम पूर्ण केले आहे. मात्र तक्रारींचा ओघ असतानाही पालिकेने साधी नोटीस देण्याचे सौजन्य दाखविले नसल्याने संताप उमटत आहे. सदरचे बांधकाम दस्तुरखुद्द महानगर पालिका कर्मचारी दीपक जाधव आणि पेशाने वकील असलेला योगेश जाधव हे करीत आहेत. एरव्ही एखाद्या इसमाने बेकायदा बांधकाम केले तर त्यावर जलदगतीने कारवाईची कुऱ्हाड चालविणारे महापालिकेचे अधिकारी आज या बांधकामावर कृपादृष्टी दाखवीत असल्याने पालिका अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाण घेवाण केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आज पर्यंत साधी नोटीस देखील या बांधकाम धारकास देण्यात आलेली नाही. पा हे कार्य पद्धतीवर सडकून टीका केली जात आहे. बघतो, करतो माणस पाठवतो बांधकाम थांबवण्यास अशाच बतावण्या एकायला मिळत आहेत. हे बांधकाम उभे राहिल्यास पावसाचे पाणी पुतळ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच शेजारी राहणाऱ्या लोकांचा पूर्वापार चालत आलेला रस्ता ही बंद होणार आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या विहिरीचे पाणी ज्या गटारातून जात आहे त्याचं गटारवर हे बांधकाम सुरू असल्याने भविष्यात गटार तूबल्यास गटाराचे पाणी गावभर पसरून रोगराई पसरू शकते. इतकी भयाण परिस्थिती या बांधकामामुळे होणार आहे . मात्र याचे काही सोयर सुतक मनपा अधिकाऱ्यांना दिसत नाही. आपल्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्याचे काम आज पर्यंत पालिका करत आली आहे. आता तरी कारवाई करा नाहीतर आंबेडकरी जनतेचा जनप्रक्षोभाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.