
डॉ प्रविण निचत सुप्रसिद्ध. ऍक्युपंक्चर थेरपिस्ट यांना महाराष्ट्र ऍक्युपंक्चर कौन्सिल तर्फे कौन्सिल चे रजिस्ट्रेशन मिळाल्या बाबत आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AIMA) च्या वतीने औरंगाबाद येथे कायरोप्रॅक्टिक डॉ रजनीश कांत, पटणा, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी केंद्रीय अर्थमंत्री मा. श्री. डॉ. भागवत कराड साहेब व AIMA चे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते AIMA ने ऍक्युपंक्चर कौन्सिल व परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी पुष्कळ प्रोत्साहन देऊन मदतही केली. त्यांच्या योगदानामुळे जवळपास 3500 लोकाना रजिस्ट्रेशन मिळाले व ऍक्युपंक्चर व्यावसायिक ताठ मानेने आपला व्यवसाय करू शकतात. डॉ प्रविण निचत हे 2003 पासून ऍक्युपंक्चर व निसर्गोपचार प्रॅक्टिस करतात. त्यांनी आतापर्यंत अडीच लाखांहुन अधिक रुग्णांना मोफत टेलिफोनिक कंसलटेशन द्वारे घरगुती औषधोपचार सांगितले आहेत व रुग्णांना त्यांच्या त्रासातून आराम मिळवून दिला आहे.
डॉ. प्रवीण निचत यांना निसर्गोपचार आणि आयुर्वेद मध्ये हॉनोररी डॉक्टरेट तसेच अल्टरनेटिव्ह आणि कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन मध्ये मानद पी. एच.डी. मिळाली आहे.
डॉ. प्रवीण निचत यांनी पंचगव्य पासूनही औषधे विकसित केली आहेत त्यामुळे त्यांना मार्च 2022 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून जाहीर सत्कार करण्यात आला होता.
अशाप्रकारे डॉ. प्रवीण निचत यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल 197 पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
