नालासोपारा :- वसई पारनाका येथे एका सीरियलचे चित्रीकरण सुरु असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस नसल्याने या कोंडीत अजुन भर पडली होती. काही सजग सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी पालिका अधिकारी, पोलीस यांना संपर्क साधल्यावर यंत्रणा हलु लागली. सदर चित्रिकरणाची वसई विरार शहर मनपाची परवानगी घेतली असली, तरी पोलीस ठाणे, वाहतुक विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. सदर परवानगी पालिका अधिकाऱ्यानी तपासूनच पुढील परवानग्या देणे क्रमप्राप्त आहे. तसे न करता थेट परवानग्या दिल्या जातात.

या बाबत सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी संदीप गमरे २ हजार रुपये इतकं नाममात्र शुल्क आकारून शूटिंगसाठी परवानग्या देतात. प्रत्यक्षात अधिकारी वर्गाला मोठी रक्कम देऊन गर्दीच्या रस्त्यावर तासं तास चित्रीकरण सुरु असते त्याचा नाहक त्रास पादचारी व वाहन धारकाना होतो. याबाबत काही पत्रकारांनी वाहतुक पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांना संपर्क साधुन माहिती दिली असता त्यांनी तात्काळ वाहतुक पोलीस पाठवला. तब्बल तीन तासांनंतर येथील वाहतुक सुरळीत झाली. वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर चित्रीकरण करण्यासाठी वाहतुक विभागाकडून परवानगी घेतली नसल्याचे माहिती प्राप्त होत आहे.

सदर कोंडीत रुग्ण वाहिका तसेच वसई विरार मनपाची गाडीही काही काळ अड़कून होती. या मुख्य चार रस्ते एकत्र येणाऱ्या वर्दळीचा रस्ता असून वसई न्यायालय, तहसीलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. असे असतानाही परवानग्या देताना अधिकारी वर्ग खातरजमा करीत नाही.

गॅस सिलेंडरचाही बेकायदा वापर

या चित्रिकरणासाठी घरगुती वापराचे गॅस सिलेंडर रस्त्यावर ठेवण्यात आले होते. मुळात घरगुती सिलेंडरचा व्यवसायिक वापर बेकायदा आहे. हे अतिशय धोकादायक आहे. पालिका प्रशासन याची खातरजमा न करता परवानग्या देते. गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध ठेवण्यात आलेल्या सिलेंडरला सिगरेट वा अन्य बाबीमुळे आग लागून एखादी अप्रिय घटना घडली तर त्याची जबाबदारी वसई विरार मनपा घेणार का? असा पादचारी वर्गाचा प्रश्न आहे.

कोट

पालिकेने परवानगी दिली आहे मात्र वहातुकीची परवानगी आम्ही तपासलेली नाही. – संदीप गमरे, (प्रशासकीय विभाग)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *