
वाहन चोरीला जबाबदार कोण ?
नालासोपारा :- वसई तालुक्यांची झपाट्याने वाढती लोकसंख्या बघता वाहनांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वसई महानगरपालिका क्षेत्रात दुचाकी, चारचाकी वाहनांना पार्किंग करण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही त्यांची वाहने इमारतीत पार्किंग करण्यासाठी मुबलक जागा मिळत नसल्याने ते रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे वाहने पार्किंग करत आहे. तर मल्टीस्पेस असो वा बस स्टँड, रेल्वे स्थानक, मॉल, शहरात ठिकठिकाणी पे अँड पार्किंगमध्ये वाहने पार्किंग केली जात आहे. याच पार्किंगमधून अनेक वेळा दुचाकी, चार चाकी वाहने चोरी झाली आहे. त्यामुळे वाहन चोरीला गेले तर जवाबदारी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. वसईतील अनेक मुख्य रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग दररोज नागरिकांना बघायला मिळत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
वसई तालुक्यात प्रत्येक वर्षाला वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वसईत मोठ्या प्रमाणात मोठं मोठी संकुले उभारली जात आहे पण इथे राहायला येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग बाबत समस्या निर्माण होत आहे. वसई तालुक्याची अंदाजित लोकसंख्या ३५ लाखांच्या वर आहे. यामुळे वाहनांची संख्याही मोठी आहे. शहरात आज घडीला २५ ते ३० लाखांच्या आसपास वाहने रस्त्यावर धावतात. यामध्ये १५ लाखांच्या आसपास दुचाकींची संख्या आहे. तर १४ लाखांपर्यंत चारचाकी वाहनांची संख्या आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वाहने असल्याने त्यांना रस्ते देखील अपुरे पडत आहे. अनेक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना इमारतीत वाहने पार्किंग करण्यास जागा नसल्याने ते बिनधास्तपणे रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करत आहे.
पार्किंगचे दर किती ?
बसस्थानक :- याच्या बाजूला व रेल्वे स्थानकाच्या जवळच असलेल्या ठिकाणी पे अँड पार्किंगची सुविधा आहे. दुचाकीला २५ रुपये तर चारचाकी वाहनांना ५० रुपये पार्किंग शुल्क आहे.
रेल्वेस्थानक :- याठिकाणी खाजगी पे अँड पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. दुचाकीला २५ रुपये तर चारचाकी वाहनांना ५० रुपये पार्किंग शुल्क आहे. तर महिन्याला ८०० ते १ हजार रुपये मासिक पास उपलब्ध आहे.
वाहन चोरीला गेल्यास जबाबदार कोण ?
जर कोणी दुचाकी आणि चारचाकी पे अँड पार्किंग करून जात असेल तर ते वाहन चोरी झाल्यास त्या वाहनाची जबाबदारी मालकाचीच आहे. मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग होत असल्याने वाहनांवर लक्ष कसे ठेवता येईल. तरीही आम्ही याठिकाणी सीसीटीव्ही सिस्टीम लावलेली आहे. – नादर भाई
सीसीटीव्हीचा पत्ता नाही
पे अँड पार्किंगमध्ये वाहने पार्क केले तरी हँडल लॉक, चारचाकी वाहनांचे काचा, खिडक्या व्यवस्थित बंद केल्या की नाही याची तपासणी केली पाहिजे. पण काही ठिकाणी सीसीटीव्हीचा पत्ता नाही आहे.
कोट
1) वसईत अनधिकृत पार्किंग किंवा नो पार्किंग मध्ये वाहने अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. पे अँड पार्किंगमधून वाहने चोरी झाले तर पैसे घेणाऱ्याचीही तितकीच जवाबदारी आहे. वाहने पार्किंगच्या बडल्यात पैसे घेता मग जवाबदारी का झटकता ? वाहने सुरक्षित व चोरी होऊ नये यासाठी खाजगी पार्किंगवाल्यांनी काळजी घेतली पाहिजे. – पोलीस प्रशासन