
प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टर किती ?
नालासोपारा :- चाळीस वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना वाहन परवाना देण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता असते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात करार तत्वावर डॉक्टरांनी नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार ४० वर्षापुढील व्यक्तींना वाहन परवाना देण्यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. वैद्यकीय तपासणीत तो व्यक्ती वाहन परवाना देण्यासाठी योग्य असेल तरच त्यास वाहन चालवण्याचा परवाना दिला जातो. त्याचप्रमाणे व्यावसायिक परवाना देण्यासाठीही वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे आरटीओने डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.
आरटीओकडे ३ डॉक्टरांची नोंदणी
विरार प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे सुमारे ३ डॉक्टरांनी नोंदणी केली आहे. या डॉक्टरांमार्फत परवान्यासाठी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते.
बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांवर कंट्रोल
वाहन परवान्यासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाऊ नये. यासाठी आरटीओमार्फत या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाते. त्यानंतरच परवाना दिला जातो.
ऑनलाइन वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी काय कराल ?
आरटीओ कार्यालयांत व्यावसायिक वाहन चालविण्याचा परवाना घेणाऱ्यांसह चाळीसहून अधिक वयाच्या व्यक्तीला वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते. वाहन परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज करताना त्यात द्यावयाच्या कागदपत्रांमध्ये ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्रही जोडले जाते.
जास्तीत जास्त २० प्रमाणपत्र देता येणार
नोंदणीकृत डॉक्टरांनी दिलेले प्रमाणपत्रच वाहन चालवण्याचा परवाना देण्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. एका डॉक्टरला जास्तीत जास्त २० प्रमाणपत्र देता येणार आहे.
प्रमाणपत्र बंधनकारक
४० वर्षांपुढील व्यक्तींना वाहन चालविण्याचा परवाना काढायचा असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक आहे. नोंदणीकृत डॉक्टरांकडून तपासणीनंतरच हे प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यानंतरच परवाना दिला जाणार आहे.
अर्ज केल्यानंतर कधी मिळणार परवाना ?
वाहन चालविण्याचा परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर किमान एक महिन्यानंतर शिकावू वाहन परवाना दिला जातो. त्यानंतर एका महिन्याच्या अंतराने कायमस्वरूपी वाहन परवाना दिला जातो. त्यासाठी वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागते.
कोट
१) नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि सोपी असून, आरटीओ विभागातील कामासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय प्रमाणपत्रे डॉक्टरांकडून घ्यावीत. – प्रवीण बागडे (सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, विरार)