
नालासोपारा मधील हजारो विद्यार्थीनी व वसई येथे कॉलेजसाठी व महिला वर्ग वसई येथे कामासाठी रोज ये जा करतात प्रवाशांमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वसई येथे जाण्याकरीता लोकलने प्रवास करावा लागतो सकाळी व सायंकाळी लोकलला गर्दी अधिक असल्याने महिला व विद्यार्थीनींना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले काढण्यासाठी तहसिलदार येथे जावे लागते.
नालासोपारा (प) ते वसई तहसिलदार बस सुरू करण्याबाबत वर्तक कॉलेज येथील विद्यार्थ्यानीने रूचिता नाईक यांच्या कडे आपले समस्या सांगितले तसेच मागणी केली असुन
महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता महिलांसाठी विशेष नालासोपारा (प) बस डेपो पासुन समेळगाव, सोपारागाव मार्गे निर्मळ, वसई, तहसिलदार पर्यंत बससेवा सुरू करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांनी केली