जिल्हा परिषद बांधकाम विभाग पालघर अंतर्गत जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम ५०५४ लेखाशिर्षकात नवली वरखुंटी, कमारा, वाकसई,झांजरोळी, माकणे कपासे, सफाळा कांदरवन ते नवघर रस्ता मजबुतीकरण करणे इजिमा प६१ सा. क्र. २/०० ते ३/४०० या कामाचा लोकार्पण सोहळा आज बांधकाम व आरोग्य समिती सभापती यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सीमा रावते, पं.स.सदस्य भारती सावे, सरपंच कमारे ग्रामपंचायत, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.
जिल्हा परिषद बंधकाम विभागामार्फत होणारी सर्व च कामे दर्जेदार व उत्तम प्रकारची झाली पाहिजेत यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन यावेळी संदेश ढोणे यांनी केले.

यावेळी जवळच असलेल्या कमारे ग्रामपंचायत मधील शाळेची पाहणी केली असता ती शाळा नादुरुस्त असून एक वर्ग मोडकळीस आला असल्याचे निदर्शनास आल्याने शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन दुरुस्त करण्याबाबतच्या सूचना सभापती ढोणे यांनी दिल्या.तसेच त्याच सरस्त्यावरवरील मोरी पुराच्या पाण्याने बंद होते व समबंधित गावांचा त्यामुळे सम्पर्क तुटतो त्यामुळे सदर मोरीची उंची वाढविण्याचे काम लवकरात लवकर करावे अशा सूचना देखील यावेळी बांधकाम व आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *