
खानिवडे , प्रतिनिधी : वसई तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 डिसेंबरच्या च्या सकाळ पासून मतदानाला सुरवात झाली होती .सकाळ ते दुपारी 11 वाजेपर्यंत अनेक ग्रामपंचायतींच्या मतदान केंद्रांवर मतदारांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या .यातील विशेष म्हणजे सद्ध्या ग्रामीण भागात रब्बी हंगाम व वाडी पिकांची कामे सुरू आहेत तरीही मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता .या मतदानात मतदानाचा नव्याने हक्क प्राप्त झालेली तरुणाई मोठया संख्येने मतदानासाठी उतरली होती त्यांच्यात औत्सुक्याची भावना दिसून येत होती .तर अपंग आणि वयस्कर असलेल्या मतदारांनी सहाय्यकांच्या मदतीने आपला मतदानाचा हक्क बजावला . 10 वाजेपर्यंत 25 तर दुपारनंतर 54 टक्के पर्यंत अनेक मतदान केंद्रावर मतदान झाले होते .मात्र दुपारी मतदान केंद्रावरील गर्दी कमालीची घसरली होती .त्यानंतर संध्याकाळी 4 सुमारास पुन्हा मतदान केंद्राकडे मतदारांनी उपस्थिती दर्शवण्यास सुरवात केली होती .दुपारी चार नंतर आलेल्या आकडेवारी नुसार अनेक प्रभागात मतदान हे 70 च्या आसपास गेले होते .एकंदरीत ह्या निवडणूकीत मतदारांमध्ये मोठा उत्साह होता .तर एकदाच 4 बटणे दाबून मतदान करण्याच्या प्रक्रियेत ग्रामीण मतदार किती प्रमाणात बरोबर मतदान करेल ही भीती उमेदवारांच्या मनात घर करून होती .तर निवड प्रक्रियेतील कर्मचारी , पोलीस ,होमगार्ड यांच्याशी अनेक ठिकाणी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे हुज्जत घालण्यात येत होती .मात्र त्यांनी आपले काम चोख बजावले .काही किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झाले .दरम्यान मतदारांनी आपल्या गावचा कारभारी कोण हे मतदान करून मतपेटीत बंद केले आहे .त्यामुळे आपल्या गावाचा कारभारी कोण याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे
या निवडणूका सदस्य व थेट सरपंच पदासाठी असून
यात वासळई, रानगाव , तरखड, खार्डी डोलीव, टेम्भी कोल्हापूर, टीवरी, खोचिवडे,टोकरे- खैरपाडा, पाणजू, पारोळ, तिल्हेर , करंजोंन, नागले, मालजीपाडा आणि कळंब अशा ग्रामपंचायतींचा समावेश आहे.