
पालघर 18 डिसेंबर
पालघर जिल्ह्यातील पालघर तलासरी वाडा वसई तालुक्यात रविवारी 63 ग्रामपंचायतीतील थेट सरपंच व सदस्य पदासाठी जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 67. 27 टक्के मतदान पार पडले होते संध्याकाळी साडेपाच पर्यंत यामध्ये वाढ होऊन सरासरी 75 ते 80 टक्के पर्यंत मतदान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली होती त्यावेळेसच सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर मतदार ग्रुप मध्ये येतानाच चे दिसत होते. संपूर्ण जिल्ह्यात शांततेने मतदानास सुरुवात झाली होती. साडेतीन वाजेपर्यंत 63 हजार 61 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत 67.27% मतदान संपन्न झाले होते पार पडले होते श्री मतदारांमध्ये 46 हजार 732 मतदारांची संख्या होती यामध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 31 हजार 185 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर पुरुषांमध्ये 47 हजार नऊ मतदारांपैकी एकतीस हजार आठ 75 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी तीन नंतर मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने साडेपाच नंतर 75 ते 80 टक्के पर्यंत मतदानाची टक्केवारी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती
चार तालुक्यातील मतदान सुरळीत पार पाडून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 41 अधिकारी,232 अंमलदार,150 होमगार्ड,स्ट्रायकिंग फोर्सच्या चार तर रॅपिड ऍक्शन फोर्सच्या दोन कंपन्यांमधील 80 अंमलदार मिळून 610 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.आपत्कालीन परिस्थितीसाठी आठ अधिकारी आणि शंभर अंमलदारांना राखीव ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली आहे.
पालघर, वसई, वाडा आणि तलासरी तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींच्या 202 प्रभागांमधून 606 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. निवडणुकीत चार तालुक्यातील 101 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.उमेदवारी अर्जा अभावी सोळा जागा रिक्त राहिल्या आहेत.499 जागांसाठी 1हजार 254 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.पालघरमध्ये 65,वसई मध्ये14 आणि वाडा तालुक्यात 22 मिळून 101 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
पालघर तालुक्यातील 31 ग्रामपंचायतच्या निवडणुकीत 99 प्रभागात 106 मतदान केंद्रे आहेत एकूण 24 हजार 275 महिला व 24 हजार 516 पुरुष असे एकूण 48 हजार 791 मतदारांची संख्या आहे. वसई तालुक्यात 15 ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून 51 प्रभागांमध्ये 55 मतदान केंद्रे असून स्त्री मतदारांमध्ये 14 हजार 637 मतदार संख्या असून पुरुषांमध्ये 14 हजार 799 व इतर एक पकडून 29 हजार 437 मतदार संख्या आहे वाडा तालुक्यात 14 ग्रामपंचायत मध्ये 42 प्रभाग असून 42 मतदान केंद्रावर स्त्री मतदारांची संख्या 7 हजार 131 असून पुरुषांची संख्या 7 हजार 58 आहे तर तलासरी तालुक्यात फक्त एक ग्रामपंचायतची निवडणूक असून तीन प्रभागांमध्ये तीन मतदान केंद्र असून 689 महिला व 637 पुरुष मतदानाचा हक्क बजावणार आहेत एकंदरीत संपूर्ण मतदारसंघात 46 हजार 732 महिला व 47 हजार 9 पुरुष व इतर एक पकडून 93 हजार 742 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीत महिलावर्ग मोठ्या प्रमाणात मतदानासाठी उतरल्याचे चित्र जागोजागी दिसत होते त्याचप्रमाणे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावण्यामध्ये तरुण व तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.