पालघर दि 20 : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय पालघर, जिल्हा क्रीडा परिषद,पालघर यांच्या वतीने, मुबंई विभागीय शालेय, हँडबॉल स्पर्धेला जिल्हा क्रीडा संकुल, पालघर येथे सुरवात झाली.

. सदर स्पर्धेत मुबंई विभागतील सर्व महानगरपालिका, व रायगड, पालघर ठाणे, मुबंई, मुबंई उपनगर या जिल्ह्यातील 14,17 व 19 वर्षाखालील मुले व मुली असे वयोगट आहेत.
*या स्पर्धेचा शुभारंभ जिल्हाधिकारी . गोविंद बोडके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांच्या शुभ हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाक्रीडाधिकारी सुहास व्हनमाने यांनी उपस्थितानचे स्वागत केले व प्रकाश वाघ यांनी सर्वांनचे आभार मानले. यावेळी हँडबॉल जिल्हासंघटना सचिव . राकेश ठाकरे व इतर तांत्रिक अधिकारी तसेच, चेतन मोरे, सरिता वळवी, सारिका फडतरे, प्रशांत महल्ले, संगम डगर, बेबी जगदाळे, मोनू यादव (सेनादल)आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *