विशेष प्राधिकरण अंतर्गत क्षेत्राचा सत्यानाश करण्यास बांधकाम व्यावसायिक उत्साहित.(खैरपाडा,कण्हेर,टोकरे)

भ्रष्टाचाराच्याच जोरावर निर्माण झाली काँक्रीटिची जंगले.

विरार : विरार शहरात बांधकाम व्यावसायिक विकास करण्याच्या नावाखाली अनधिकृत बांधकामे उभारत आहेत.काँक्रीटीकरण करून येणाऱ्या पिढीला देशोधडीला लावण्याचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. प्रामुख्याने परप्रांतीय बांधकाम व्यावसायिक या गोरख धंद्यात सहभागी आहेत.आपल्याच संबंधातील नातेवाईकाना स्वस्त घरांचे आमिष दाखवत लुटण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.असे किती प्रकार उघडकीस होऊन सुद्धा सर्व जसे चे तसे चालू आहे.पोलीस ठाण्यात तक्रारी वाढत चालल्या आहेत.परंतु यामध्ये पोलिसांचा दोष नाही कारण असे परप्रांतीय व्यावसायिक आम जनतेला फसवल्यानंतर आपल्या मूळ गावी जाऊन लपून बसतात.वसई विरार शहरात बांधकामे वाढण्या मागे भ्रष्टाचार हे मूळ आहे.द्रव्याचा मोह बाळगून जो तो यात मिलिंन झालेला आहे.बांधकाम व्यावसायिक आणि अधिकारी यांच्यातील आर्थिक संबंध आम जनतेला फसवणूकीच्या जाळ्यात ढकलण्याचे काम करत आहेत.शिवाय विशेष प्राधिकरण अंतर्गत क्षेत्राचा सत्यानाश करण्यास बांधकाम व्यावसायिक उत्साहित आहेत.त्याचबरोबर असे म्हणणे ही चुकीचे ठरणार नाही की, ‘भ्रष्टाचाराच्याच जोरावर निर्माण झाली आहेत काँक्रीटिची जंगले.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *