वसई :-
सहकरात अग्रगण्य अशा वसई तालुक्यातील वसई तालुका उपनिबंधक सहकारी संस्था,तामतलाव
बाबतीत भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी शनिवारी वसई तालुका पत्रकार संघाचे विद्यमान सचिव आशिष राणे यांनी आपल्या पत्रकार संघाच्या शिष्टमंडळासोबत वसईत विविध कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या राज्याचे सहकारमंत्री अतुलजी सावे यांची भेट घेत तालुक्यातील सहकारी संस्थासंबंधी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केलं आहे
याप्रसंगी वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित, सचिव आशिष राणे,तसेच संघाचे जेष्ट पदाधिकारी आनंद गदगी,सोबत अन्य पत्रकारामध्ये राजेश राऊत, विजय खेतले,मच्छिद्र चव्हाण आदी मान्यवर पत्रकार मंडळी उपस्थित होती
मुंबई शेजारी व तिसरी मुंबई संबोधल्या जाणाऱ्या वसई तालुक्याचा मागील काळात लोकसंख्येच्या मानाने मोठ्या प्रमाणात झटपट विस्तार व विकास झाला सोबत येथील सहकारी संस्थाचे जाळे ही वाढले,
मात्र त्या बदल्यात शासकीय इच्छाशक्ति कमी व प्रशासकीय यंत्रणा पाहिजे तशी ठाम उभी राहिली नाही किंबहुना आज वसई तालुक्यात सर्वाधिक सात हजार पेक्षा अधिक सहकारी संस्थाचा कारभार आणि त्यात गृहनिर्माण संस्थाचा आकडाच 6 हजार हुन अधिक आहे
अर्थात हा कारभार हाकण्यासाठी एकमेव उपनिबंधक कार्यालय हे तामतलाव येथे कार्यरत आहे आणि त्यात फक्त एका उपनिबंधक पदासह केवळ सहा जणांवर वसई तालुक्याचा कारभार चालतो आहे
अर्थात हे प्रमाण व्यस्त आहे मात्र आजपर्यंत राज्य शासनाने त्यांचा अधिकारी कर्मचारी वर्गाचा आकृतीबंध पूर्वीचाच ठेवलेला असून नव्याने तो आकृतिबंध आजपावेतो मंजूर केलेला नाही
याखेरीज येथील भाड्याच्या जागेत असलेलं हे कार्यालय मोडकळीस आलेले असून कार्यालयात बसण्यासाठी ही फार अशी व्यवस्था नाही तर शासकीय जुने -नविन दप्तर जतनासाठीची ही वानवा आहे
विशेषतः हे कार्यालय भाडेतत्त्वावर आहे मात्र आता तरी शासनाने ते स्व मालकीचे आणि ते ही वसई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असावे, तसेच विविध संस्था,बँका ,त्यांचे पदाधिकारी,वकील मंडळी, नागरिक यांची दावा सुनावणी वेळी दिवसभर येणाऱ्या या कार्यालयात आसनव्यवस्था देखील नाही ती परिपूर्ण करावी असे ही या निवेदनात म्हटले आहे
अर्थात अभ्यागत,सभासदांच्या दैनंदिन तक्रारी, दावे, प्रकरणे चालवण्यासाठी तांमतलाव स्थित एकाच कार्यालयावर लाखो अभ्यागताना अवलंबून रहावे लागते ही शोकांतिका आहे
दरम्यान मागील काळात काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडी सरकारने याच वसई तालुक्यातील उपनिबंधक कार्यालयाचे तीन भागात विभाजन करून नालासोपारा, विरार व वसई असे तीन उपनिबंधक कार्यालय म्हणून विस्तार करण्याचा प्रस्ताव पारित केला होता
मात्र आजही वसईत तीन ठिकाणी स्वतंत्र कार्यालय अद्यप विस्तारलेली नाहीत किंवा त्याचा उल्लेख ही मागील काळात झालेला नाही
त्यामुळे वसईच्या सहकारी संस्थाना व त्यांच्या अनेक संस्था पदाधिकारी व सभासद व नागरिकांना स्वतः उपनिबंधक व त्यांच्या कर्मचारी वृंद वर्गास भेडसावत असलेल्या समस्या बाबतीत सहकार मंत्री अतुलजी सावे यांनी त्यांच्या मंत्रालयात आढावा बैठक घेत पुढील काळात योग्य ती उपाययोजना करून वसईच्या सहकाराला नवसंजीवनी दयावी अशा विविध प्रकारच्या समस्याचे सविस्तर निवेदन वसई तालुका पत्रकार संघाच्या वतीनं सहकार मंत्री यांना देण्यात आले त्यावेळी त्यांच्या समवेत आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर ही उपस्थित होते
त्यावेळी सहकार मंत्री अतुल सावे यांनी संघास सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या निवेदनाबाबत सहकार विभागाकडून माहिती घेऊन उचित कार्यवाही करू असे स्पष्ट केले
वसई तालुका पत्रकार संघाने सहकार मंत्री यांच्यासमोर उपस्थित केलेल्या या प्रश्न व समस्येबाबतीत दिलेल्या निवेदनाममुळे सहकार क्षेत्रातील धुरीणांनी समाधान व्यक्त करत पत्रकार संघाचे जाहीर आभार मानले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *