
खाजगी वाहनांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर…
नालासोपारा :- स्कुल बसचे शुल्क खाजगी वाहनांच्या तुलनेत जास्त असते. मात्र विद्यार्थ्यांची सुरक्षा खाजगी वाहनात कमी असते? शाळा साधारण ८ ते ९ महिने सुरू राहत असल्या तरी स्कुल बसचे शुल्क मात्र वर्षभराचे घेतले जाते. प्रत्येक शाळेत शालेय परिवहन समिती असणे अनिवार्य आहे. प्रत्यक्षात तसे दिसत नाही आणि समितीची स्थापना केली असली तरी ती प्रत्यक्षात कार्य ती कार्यरत नसल्याचे अनेक शाळांमध्ये दिसून येते. शहरातील अनेक भागांमध्ये स्कुल बस सोबतच खाजगी वाहानांमधूनही विद्यार्थ्यांची वाहतूक होते. यात खाजगी वाहन चालकाकडून स्कुल बसपेक्षा कमी भाडे आकारले जात असल्याने पालकांचा खाजगी वाहनांकडे असल्याचे दिसून येते. शिवाय खाजगी वाहनांसाठी महिन्यानुसार भाडे द्यावे लागत असल्याने त्यातही दोन ते तीन महिन्याचे भाडे बचत होत असल्याने पालकांची पसंती खाजगी वाहनांनाच मिळत असल्याचे दिसून येते.
खासगी वाहनापेक्षा स्कूल बस महाग
शहरात अनेक शाळांमध्ये स्कुलबस सोबतच खाजगी वाहनांमधूनही विद्यार्थ्यांची वाहतूक होते. खाजगी वाहन चालकाकडून स्कुलबसपेक्षा कमी भाडे आकारले जाते. त्यामुळे पालकांचा कल खाजगी वाहनांकडे आहे.
खासगी वाहनात सुरक्षेचे काय ?
विद्यार्थ्यांची वाहतूक करताना खाजगी वाहनचालक स्कुल बसपेक्षा कमी भाडे आकारत असले तरी क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असल्याचे दिसून येते. पालकांच्या खर्चात बचत होत असली तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शालेय परिवहन समित्या कागदावरच
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शालेय परिवहन समित्या तयार करण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र, अद्याप जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांसह खाजगी शाळांमध्येही शालेय परिवहन समित्या कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश शाळेमध्ये शालेय परिवहन समित्यांची बैठक होत नाही. या समित्या कागदोपत्री उरल्या आहेत.
स्कूल बस फीवर नियंत्रण कोणाचे ?
स्कुल बस फिवर कोणाचे नियंत्रण उरलेले नाही. शाळा व्यवस्थापन समिती आणि बसमालक यांच्यातील करारानुसार निश्चित केलेले शुल्क पालकांना द्यावे लागते. त्यामुळे त्यामध्ये कितीही वाढ केली तरीही पालकांना ती स्वीकारावी लागत आहे. तसेच, रिक्षानेही मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. रिक्षाच्या भाड्यावरही कोणाचे नियंत्रण नाही.
प्रवेश घेताच वर्षाचे भाडे
मनमानी कारभारामुळे स्कुल बसचे वार्षिक भाडे प्रवेश घेतानाच द्यावे लागते. दिवाळी, नाताळ आणि उन्हाळी सुट्यांमुळे ८ ते नऊ महिनेच पूर्णवेळ शाळा असल्याने याच कालावधीत नियमित स्कुलबस चालतात. असे असतानाही पालकांना वर्षभराचे भाडे द्यावे लागते. – संदीप पाटील (पालक)
कोट
१) प्रादेशिक परिवहन कार्यालयाची विद्यार्थी वाहतुकीवर नजर आहे. मात्र स्कुलबसचे भाडे निश्चित करण्याचे अधिकार हे शालेय समितीला आहे. – आरटीओ अधिकारी