
वसई, दि.3(प्रतिनिधी ) – वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष, तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे यांच्या 53 व्या वाढदिवसा निम्मित दि.4 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता संत गोन्सालो गार्सिया कॉलेजमध्ये या महाविद्यालयासाठी ग्रंथ भेट देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. वसई विरार महानगर पत्रकार संघ अणि कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सोमनाथ विभुते, कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखेचे कार्याध्यक्ष रेमंड मच्याडो, महानगर पत्रकार संघाचे पदाधिकारी विजय खेतले, चंद्रकांत भोईर आणि वसई को.म.सा.प.चे कार्यवाह संतोषकुमार गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
गेली सतत 36 वर्षे राज्यातील विविध ख्यातनाम दैनिकातून पत्रकारिता साकारत आलेले ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे हे लीलाई दिवाळी अंक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मराठी भाषा, तसेच साहित्य संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय आहेत. त्यांच्या यंदाच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त दि.4 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता संत गोन्सालो गार्सिया कॉलेजमध्ये या महाविद्यालयासाठी मान्यवर लेखकांचे सुमारे 40 ग्रंथ भेट देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी यावेळी पत्रकार सहकारी आणि साहित्य प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखेचे कार्याध्यक्ष रेमंड मच्याडो आणि महानगर पत्रकार संघाचे खजिनदार विजय खेतले यांनी केले आहे.