
बोईसर च्या बँक ऑफ बडोदा मधील चिल्लर वर हात साफ करणाऱ्या चोरट्यांना अवघ्या २४ तासांत अटक करण्यात पोलिसाना यश आले आहे.
रात्रीच्या सुमारास खिडकी वाटे आत शिरलेल्या चोरटयांनी बँकेतील २ लाखाची चिल्लर चोरून नेली होती.या प्रकरणी बोईसर पोलीसांनी आरोपी शिवणारायन रामसेवक गौतम
आणि अनिल गणेश शाह या दोन परप्रांतीय चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख ८० हजारांची चिल्लर परत मिळवली आहे.
बोईसर येथील तारापूर रोडवर असलेल्या बँक ऑफ बडोदा शाखेच्या मागील खिडकीचे ग्रील उचकटून एक्झॉस्ट फॅन काढून आत शिरलेल्या चोरट्यांनी दोन लाख रुपयांची चिल्लर लंपास केली होती. २९ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता बँक बंद केल्यावर रात्रीच्या सुमारास खिडकीवाटे बँकेच्या आत मध्ये शिरलेल्या चोरट्यांनी स्ट्रोंग रूममधील लॉकर रूम समोर ठेवलेल्या २० रुपये नाण्याच्या पाच पिशव्या चोरून नेल्या होत्या. या पिशव्यांमध्ये एकूण दोन लाख रुपयांची चिल्लर होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे बँक उघडताच चोरीचा हा प्रकार समोर आल्यावर याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक यांनी बोईसर पोलीस स्टेशन येथे तक्रार देताच अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग नित्यानंद झा आणि पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी भेट देऊन पाहणी करून त्यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस उपनिरीक्षक शरद सुरळकर यांना तपास देण्यात आला होता.
त्यानुसार पोलीस पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलिस अधिकारी नित्यानंद झा,पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद सुरळकर व उपनिरीक्षक शरद सुरळकर, विठ्ठल मणिकेरी, पोलीस हवालदार सुरेश दुसाने, विजय दुबळा, शरद सानप, पोलीस नाईक संदीप सोनवणे, योगेश गावित, संतोष वाकचौरे, देवेंद्र पाटील, पोलीस शिपाई धीरज साळुंखे, मयूर पाटील, मच्छिंद्र घुगे त्यांच्या पथकाने तांत्रिक कौशल्य वापरत अवघ्या २४ तासांत बँकेतील चोरीचा छडा लावला.