अनिलराज म्हणजे एका कार्यप्रवण कार्यप्रणालीची कार्यशाळा..! पत्रकारितेला हरवलेल्या माणुसकीचा आणि गमावलेल्या मानसन्मानाचा पुनर्आयाम देण्याचा यथोचित आणि यथाशक्ती प्रयत्न करणारा प्रामाणिक पत्रकार..! त्यामुळेच अनिलराजच्या वाढदिवसानिमित्त दि.4 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता संत गोन्सालो गार्सिया कॉलेजमध्ये या महाविद्यालयासाठी ग्रंथ भेट देण्याचा उपक्रम वसई विरार महानगर पत्रकार संघ अणि कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सोमनाथ विभुते आणि कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखेचे कार्याध्यक्ष रेमंड मच्याडो या सारखे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

     "सामर्थ्य आहे चळवळीचे..     
       जो जो करील त्याचे..!"

दासोक्तीनुसार टिंबाटिंबांना जोडुन सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक चळवळीचं सामर्थ्य निर्माण करणारा एक सामान्य कार्यकर्ता..!

       या मायावी मोहमयी दुनियेत पैशाने पदरात पाडलेल्या पदांमुळे नावारूपाला येणारे हजारों लाखों महाभाग पहायला मिळतात.. पण स्वकर्तृत्वाने स्वबळावर सन्मानाने मिळालेल्या पदाला आनबानशान मिळवुन देणारे अनिलराजसारखे फार थोडे..!

       " जया अंगी मोठेपण तया यातना कठीण..!" पत्रकारितेचं माध्यम अबाधित ठेवुन.. अकलंकीत राहुन मी समाजाचं - देशाचं देणं लागतो.. सकारात्मक सृजनशील निर्मिती करु शकतो.. आणि पत्रकारितेचं चारित्र्य पावित्र्य जपू शकतो ह्या झपाटलेल्या उर्मीने साडेतीन दशके खारीचा वाटा आपल्यापरीने उचलणारा हा स्थितप्रज्ञ पत्रकार..!

वैभव कधीही नव्हें शाश्वत..
शरीर हें तो सर्वदा अनित्य..
जाणुनि मृत्यु नित्य सन्निहित..
धर्म जागृत ठेवावा..||

हे त्रिकालाबाधित सत्य आपल्या विचारांतून आचरणातून आणि आपल्या लेखणीतून जिवंत ठेवणारा जातिवंत पत्रकार..! जबाबदारी घेतांना ‘मी’ आणि श्रेय घेतांना ‘आपण’ हे शब्द केंद्रस्थानी ठेवुन, आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सतत कार्यरत रहाणारा हा कर्मवीर पत्रकार..! “तुम्ही फळांच्या अपेक्षेने चौफेर बहरता.. आम्ही मूळांना खोलवर रुजवायचा प्रयत्न करतो..!” हे जीवनमूल्य जगणारा जिगरबाज पत्रकार..!

         " पल पल रंग बदलती इस दुनिया में। हमें गुरूर है अपने बेरंग होने पर।।" ह्या अभिमानी आत्मतत्वावर ठाम असलेला तत्त्वनिष्ठ पत्रकार आहे..! "Develope your character that deserves  success..!" स्वतःचं आयुष्य स्वतः घडवताना.. संस्कारांतून सत्कर्माची वाट चोखाळत यशाकडे झेपावलेला हा खिलाडू पत्रकार "Work Hard in silence.. Let success make the noise..!" हा अप्रत्यक्ष संदेश देत असतो..!

        जिथे "अभिमानकी ताकत फरिश्तोंको भी "शैतान" बना देती है.." तिथे "नम्रता" साधारण व्यक्ति को भी "फ़रिश्ता" बना देती है। आणि हीच अनिलराजच्या कार्यकर्तृत्वाची आजची ओळख आहे..! ती चिरंतन अबाधित राहो..हीच त्याच्या वाढदिवसानिमित्त अपेक्षा करतो..! 

   सीढियाँ उन्हे मुबारक हो
                   जिन्हें छत तक जाना है..
   मेरी मंझिल तो आसमाँ है
                   रास्ता मुझे खुद बनाना है..!

                          -  अनंत सामंत.
                   स्तंभलेखक पत्रकार. वसई.
           

    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *