
नालासोपारा, तेहसीन चिंचोलकर :आज दिनांक 7 रोजी नालासोपाऱ्यातील लॉर्ड्स इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत शिकणाऱ्या गोंडस सर्व हुशार मुलांनी आपापल्या परीने सायन्स एक्सिबिशन मध्ये भाग घेऊन विविध प्रोजेक्ट तयार केले. त्याचे सुंदर प्रदर्शनास आज मी भेट दिली. शनिवारी सकाळी 8 ते सायकाळी 4 वाजेपर्यंत हे एक्सिबिशन भरले होते. येथे भेट देऊन मला कळाले की मुलं ही देवा घरची फुलं पण त्यांचे डोके मात्र कॉम्प्युटर मशीन पेक्षाही पुढे.
शाळेतील प्राणगन व थेट चौथ्या मळ्यापर्यंत हे एक्सिबिशन भरवले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने यात आवर्जून भाग घेतले होते. विज्ञानचे विविध प्रकाराचे प्रयोग येथे पाहायला मिळाले जसे सोलर सिसस्टिम, स्ट्रीट लाईट, रॉकेट असे विविध विषयावर मत मंडण्यात मुलांनी बाजी मारली.
प्रत्येक मुलाचे उत्साह बघून एक्सिबिशन पाहणाऱ्यांनी प्रत्येकाचे खूप कौतुक करून त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या व त्यांचे प्रोजेक्ट सोबत फोटो ही काढले. शाळेतला असा वातावरण पाहून कळून येते की देशातला प्रत्येक विद्यार्थी हा देशाचा भवितव्य असणार हे नक्की.