
सुशांत शेलारजींचे युवाशक्ती फाउंडेशन कडून खूप खूप अभिनंदन .:- कर्मवीर स्नेहाताई जावळे
करोना काळामध्ये अतिशय संवेदनशील पणे समाजासाठी उभ राहणारे अन्नधान्य पुरवणारे सुशांत शेलार बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या सचिव पदी नियुक्त करण्यात आले .
हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला मराठी कलाकार , मराठी माणसांच्या मनावर राज्य करतोच तोच कलाकार आज आपल्याला शिंदे साहेबांसोबत कार्यरत असलेला दिसतो. निस्वार्थ भावनेने करुणांमध्ये असंख्य लोकांना धान्य वाटप करून त्यांच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी मदत करणारे याशिवाय कधीही कोणाला कशाचीही मदत लागली तरी एका फोनवर नेहमीच मदतीसाठी जाणारे तत्परतेने मदत पुरवणारे असे सुशांत शेलार आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये पक्षाचे सचिव म्हणून नियुक्त झाले आहेत. वेळोवेळी सुशांत जी मधले समाजसेवक नेहमीच पाहिलेले आहेत . सुशांत कडे पाहिले की हे लक्षात येतं समाजसेवा सांगून केली नाही जात तर समाजसेवेचे गोड मुळात ती भावना स्वभावातच असावी लागते .
सुशांतजींच्या चाहत्यांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून त्यांना अभिनंदन केले आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
युवाशक्ती संस्थेच्या संस्थापक कर्मवीर स्नेहा जावळे यांनीही सुशांत शेलारजींना त्यांच्या नियुक्तीसाठी अभिनंदन केले आहे आणि पुढच्या कार्याला त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत .