
श्री राजेंद्र कांबळे यांनी ए.सी.पी. देशमुख यांच्या उपस्थितीत पी.आय. वराडे यांच्याकडून विरार पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला
मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस आस्थपाना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार नुकत्याच करण्यात आल्या.
विरार पोलीस ठाण्याचे सध्याचे प्रभारी सुरेश हरिभाऊ वराडे यांच्या जागेवर श्री. राजेंद्र गणपत कांबळे यांना कार्यभार सोपवण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून राजेंद्र कांबळे यांच्याकडे तुळींज पोलीस स्टेशनचा कार्यभार होता.
तुळींज येथे असताना राजेंद्र कांबळे यांनी आपल्या कार्यशैलीने गुन्हेगारांवरती जरब तर बसवलीच पण आपल्या सोबत हाताखाली काम करणाऱ्या इतर सहकारी व कर्मचाऱ्यांना वडिलकीच्या नात्याने सांभाळण्यात आणि आपलेसे करण्यात देखील ते यशस्वी झाले.
तुळींज पोलीस स्टेशनचा कार्यभार सोडण्याच्या दिवशी कांबळे साहेबांच्या सहकाऱ्यांनी साश्रू नयनांनी गुलाब पुष्प वर्षाव करून त्यांना अत्यंत भावपूर्ण निरोप दिला.
कांबळी साहेबांना त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेला भावपूर्ण निरोप कायम लक्षात राहणारा तर होताच पण यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे तुळींज पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना वडिलकीच्या नात्याने सांभाळणाऱ्या कांबळी साहेबांनी निश्चितपणे आपल्या सहकाऱ्यांकडून प्रचंड आदर आणि प्रेम कमावले यात काही दुमत नाही.
या प्रेमाची आणि आपुलकीची तुलना पैशाने होणे तर केवळ अशक्य ..!!