
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण विभागाचे सचिव यांनी 16 जानेवारीपासून मीटर *रिकॅलिब्रेशन करता पन्नास रुपये प्रतिदिन व परवाना निलंबन तथा जास्तीत जास्त पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्याचे लेखी आदेश केले आहेत.उप प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई क्षेत्रात शेअर प्रमाणे रिक्षा भाडे आकारले जाते . तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व भाडे शहरे रिक्षा प्रमाणे यापूर्वीच मंजूर करण्यात आले तसेच 23 रुपये प्रमाणे दरवाढ अद्यापही लागू करण्यात आलेली नाही . संपूर्ण पालघर जिल्ह्यात भाडे घेतले जाते व ते पूर्वी निश्चित केले आहे त्यामुळे इथे री कॅलिब्रेशन करण्याची तातडीची गरज नाही. त्याचबरोबर प्रशासनाने या संदर्भातली कोणतीही पूर्वकल्पना व सूचना येथील रिक्षा संघटनांना दिलेल्या नव्हत्या या निर्णयाबाबत 16जानेवारी 2023 रोजी समाज माध्यमातून सर्व संघटनांना माहिती मिळाली हा दंड अत्यंत चुकीचा व अन्यायकारक आहे. तरी री कॅलिब्रेशन बाबत आकारण्यात आलेली दंडात्मक कारवाई तात्काळ थांबवून ज्या ठिकाणी शेअर रिक्षा दर प्रणाली सुरू आहे त्या ठिकाणी मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी त्याचबरोबर या आदेशाची माहिती रिक्षा टॅक्सी संघटनांना दिले नाही त्याचबरोबर वसई विभागातील परिवहन क्षेत्रांमध्ये मीटर लावणाऱ्या संस्था या मोजक्याच आहेत त्यांना देखील शंभर प्रोग्राम दिवसाला दिले जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्षा कॅलिब्रेशन चे काम वाढल्यामुळे आठ ते दहा दिवस लागणार आहेत. त्याचबरोबर फेब्रुवारी कार्यालया मधील नेट वारंवार जात असल्यामुळे तिथे देखील रिक्षाचालकांनी पावती करण्यासाठी गर्दी होत आहे .या सर्व बाबींचा विचार करून मिटर री कॅलिब्रेशन वर सुरू केलेला दंड तात्काळ रद्द करावा .आशी मागणी ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाच्या तातडीच्या झालेल्या सभेमध्ये करण्यात आली आहे. यावेळी महासंघाचे अध्यक्ष विजय khetale ,प्रथम अध्यक्ष मधुसुदन राणे,सचिव महेश कदम ,कार्याध्यक्ष बाबूलाल राजभर, उपाध्यक्ष अरविंद पाटील, पदाधिकारी पूतळाजी कदम , नारायण राज पुरोहित, विजय मिश्रा ,जयकर तिवारी ,शरद जळगावकर व तालुक्यातील 40 रिक्षा संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. मागणी मान्य न झाल्यास 25 जानेवारीला संपूर्ण पालघर जिल्ह्यातील रिक्षा टॅक्सी बंद करण्यात येणार आहेत असे अध्यक्ष विजय खेत ले यांनी सांगितले आहे. या बाबतचे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रधान सचिव परिवहन सचिव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसई यांना महासंघाच्या शिष्टमंडळाने दिले. यावेळी सचिव महेश कदम ,माजी अध्यक्ष मधुसूदन राणे ,पदाधिकारी विजय मिश्रा, रिजवान शेख ,मच्छिंद्र चव्हाण, शरद जळगावकर, इत्यादी उपस्थित होते.