
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब यांच्या हस्ते नायगावच्या स्नेहा जावळे यांना बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ” बाळासाहेबांच्या लेकी ” वारसा कर्तुत्वाचा सन्मान माय भवेनीचा हा पुरस्कार 23 जानेवारीला मुंबई यशवंतराव चव्हाण या ठिकाणी मिळाला.
मागच्याच महिन्यात स्नेहा जावळे यांना पीपीसी न्यूज द्वारे तयार करण्यात आलेल्या जागतिक 100 कर्तुत्वान महिलांच्या यादीत नाव असलेल्या सतत त्यांच्या कामामुळे त्यांची नोंद सर्वत्र घेतली जाते. याचेच उदाहरण म्हणजे बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार आहे . स्नेहा ताई तुम्हाला भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या हातून असे चांगले कार्य सतत घडत राहावे .
