
जिल्हा परिषदे मधे आजपासून बायोमेट्रिक हजेरीस सुरुवात झाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी तसेच अन्य अधिकाऱ्यांनी देखील आज बायोमेट्रिक हजेरी लावून शुभारंभ केला.
जिल्हा परिषद प्रवेशद्वार आणि सामान्य प्रशासन विभागाच्या बाहेर असे तीन मशीन बसवण्यात आले असून २१३ अधिकारी व कर्मचारी यांची नोंदणी झाली अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन कामानिमित्त फिरती वर असल्याने १८१ कर्मचाऱ्यांनी आज बायोमेट्रिक हजेरी लावली.
बायमेट्रिक हजेरी सर्व कर्मचारी व अधिकारी यांना बंधनकारक असून या पद्धतीमुळे कर्मचारी व अधिकारी यांच्या नियमित वेळेची नोंद होऊन सर्व कर्मचारी वेळेत कार्यालयात येतील असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केले आहे.