सचिन केशव कदम, अध्यक्ष नालासोपारा विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

वसई : वसई तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात घडणाऱ्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. अनेक वाहनचालक हे निवोन्स लाईट्सला परवानगी नसतानाही बेकायदेशीरपणे निवोन्स लाईट्सचा वापर करतात. निवोन्स लाईट्सचा प्रकाश हा इतर सामान्य लाईट्सपेक्षा दुप्पट असतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी सदर लाईट्सचा प्रकाश समोर येणाऱ्या वाहनचालकाच्या डोळ्यावर पडत असल्याने वाहनचालकाला समोरचे काही दिसत नाही. याचा परिणाम वाहनचालकांचे गाडीवरील ताबा सुटून वाहन इतर वाहनांना धडकते. त्यामध्ये इतरांना आपला जीव गमवावा लागत आहे किंवा आयुष्यभर अपंगत्वास सामोरे जावे लागत आहे. वसई-विरार उपप्रदेशात यासारख्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

यापार्श्वभूमीवर वसई तालुक्यात बेकायदेशीरपणे निवोन्स लाईट्सचा वापर करणाऱ्या वाहनचालकांवर कार्यवाही करण्याची मागणी परिवहन आयुक्त, मुंबई, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वसई यांच्याकडे दि.०१/०६/२०१९ रोजीच्या पत्राव्दारे केली होती.

सदर पत्राच्याअनुषंगाने मा.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वसई यांनी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दि.१६/०७/२०१९ रोजी वायुवेद पथकास वसई तालुक्यात बेकायदेशीरपणे निवोन्स लाईट्सचा वापर करणाऱ्या वाहनचालकांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सचिन केशव कदम, अध्यक्ष नालासोपारा विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *