अपंग जनशक्ती संस्था तसेच महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना वसई विरार शहर अध्यक्ष देविदास जयवंत केंगार हे अपंग जनशक्ती संस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्व टीम सोबत दरवर्षी दिव्यांगांच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करत असतात. हे दिव्यांगांच्या क्रिकेट सामने दरवर्षी वसई पूर्व येथील तारकेनगर या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात अपंग जनशक्ती चषक दिव्यांगांसाठी अंडर आर्म बॉक्स क्रिकेट सामन्याचे आयोजन करतात.
अपंग जनशक्ती चषक 2023 या दिव्यांग क्रिकेट सामन्यांमध्ये दिव्यांग संघांना खेळण्यासाठी मोफत प्रवेश दिला जातो तसेच त्यांना जेवणाची व्यवस्था केली जाते. अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेनेचे वसई विरार शहर अध्यक्ष देविदास केंगार तसेच त्यांची पूर्ण टीम हे गेल्या सहा ते सात वर्षापासून वसई विरार नव्हे तर पूर्ण पालघर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी सतत लढा देत असतात.पालघर जिल्ह्यातील दिव्यांग बंधू व भगिनींना दिव्यांगांना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत त्यांची धडपड सुरू असते. अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देविदास जयवंत केंगार आणि त्यांची संपूर्ण टीम ही दिव्यांगाना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. तसेच दिव्यांगांना व्हीलचेअर, ट्रायसिकल, कुबड्या, श्रवण यंत्र असे अनेक जीवनावश्यक वस्तूंचा त्यांच्याकडून दिव्यांग बंधू व भगिनींना मदत केली जाते.
अपंग जनशक्ती संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मोफत मोतीबिंदू ची शस्त्रक्रिया तसेच आरोग्य विषयासाठी असणारी मदत सुद्धा देविदास केंगार हे आपल्या माध्यमातून करत असतात. देविदास जयवंत केंगार हे दिव्यांगांसाठी आणि सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. दिव्यांगांसाठी पालघर जिल्ह्यात कुठेही दिव्यांगांसाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात येत नाही हे लक्षात येताच अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देविदास जयवंत केंगार, उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, सचिव चंपक शहा ,खजिनदार अशोक पुजारी, गोपीचंद नाक्ती,विनय घोगले, जितू जयस्वाल, लालासाहेब धायगुडे , निलेश भूताव या सर्वांनी आपल्या दिव्यांग खेळाडूंना तसेच त्यांच्या कलागुणांना मिळण्यासाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात 2018 पासून सुरुवात केली आहे . दिव्यांगांसाठी अपंग जनशक्ती चषक दरवर्षीप्रमाणेही याही वर्षी म्हणजेच रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आले होते. या दिव्यांगांच्या क्रिकेट सामन्याच्या अपंग जनशक्ती चषक ला चार वर्षे पूर्ण झाली आहे.
अपंग जनशक्ती चषक 2023 चे उद्घाटन वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रभाग समिती जी चे माजी सभापती रमेश गोरखना यांच्या हस्ते करण्यात आले.
अपंग जनशक्ती चषक 2023 या दिव्यांग क्रिकेट सामन्यांसाठी मनसेचे पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव , मनसेचे वसई विरार शहर अध्यक्ष प्रवीण भोईर , मनसेचे माजी नगरसेवक प्रफुल पाटील ,वसई शहर अध्यक्ष स्वप्निल डिकुन्हा, पालघर लोकसभा चे अध्यक्ष जयेंद्र पाटील तसेच वालीव विभाग प्रमुख शंकर कदम ,वसई पूर्व विभागाचे अध्यक्ष नितीन गोरगिळे, समाजसेवक निलेश वाढाण, समाजसेवक गणेश धुमाळ, समाजसेवक सोनू मिश्रा, समाजसेविका पूजा दीदी मिश्रा, साई संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष संदेश पवार , समाजसेवक मोफत आली खान , नीरज गुप्ता ,या सर्व मान्यवरांनी या दिव्यांग क्रिकेट सामन्यासाठी उपस्थित दर्शवून सर्व दिव्यांग खेळाडूंचे प्रोत्साहन वाढविल्याबद्दल सर्व दिव्यांगांनी त्यांचे आभार मानले..
हे अपंग जनशक्ती चषक 2023 यशस्वी पार पाडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे वालीव फाटा तारकेनगरचे अध्यक्ष नागेश कुराडे, अनिल गडकरी, दिपिकेश पवार ,आकाश पवार ,बलवीर सिंग ,अल्ताफ सय्यद तसेच वालीव फाटा तारकेनगरचे रहिवाशी यांनी हे दिव्यांगांचे क्रिकेट सामने यशस्वी पार पाडण्यासाठी खूप मेहनत घेतली.
अपंग जनशक्ती चषक 2023 चे या क्रिकेट सामन्याचे समालोचन व सूत्रसंचालन विनय घोगले, कल्पेश गायकर, आकाश पवार यांनी केले.
अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देविदास जयवंत केंगार आणि संस्थेचे पूर्ण टीम यांनी सर्व दिव्यांग खेळाडूंचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *