वसई : ( प्रतिनिधी) : मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सायवन गावातील जंगलात ४० वर्षीय महिलेची अज्ञात आरोपीने निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. विरार पोलिसांनी याप्रकरणी विशेष पथक स्थापन करून ३६ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. राजेश बाळू पवार (वय ३० वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. त्याने केलेली शरिरसुखाची मागणी मयत महीलेनी धुडकावून लावली होती. तसेच याप्रकरणी टी पतीला व गावात सांगणार असल्याची धमकी तिने आरोपीला दिली. तिच्या धमकिने घाबरलेल्या राजेशने अनिता अंकुश मडके हिच्या डोक्यात दगड घालून धारदार शस्त्राने तिची हत्या केली होती. पोलिसांनी सदर प्रकरणाचा जलदगती तपास करून खुन्याला अटक केली.
आरोपीला अटक झाल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याद्वारे प्रसारित केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *