
वसई/विशेष प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी वसई-विरार शहर जिल्हा व भारतीय जनता पार्टी वसई-विरार शहर जिल्हा युवा मोर्चा पुरस्कृत श्री शिवप्रहार प्रतिष्ठान यांनी वसई पंचवटी येथे आयोजित केलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
रविवारी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवप्रहार प्रतिष्ठानतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 वाजता शिवप्रतिमेचे पूजन वसई विधानसभाप्रमुख शेखर धुरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासोबत वसई-विरार शहर जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट, जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील, माजी नगरसेवक किरण भोईर, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सतीश भोंडवे, उद्योग आघाडीचे सुरेश प्रजापती, अमित पवार आदी मान्यवर उपस्थित होते. शिवप्रतिमेच्या पूजनानंतर मोफत वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
पंचवटी येथील बॅक्सी प्राईम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सदर मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोफत वैद्यकीय शिबिराचा लाभ परिसरातील शेकडो नागरिकांनी घेतला. दुपारी 3 वाजता मकरंद गुरुजींच्या हस्ते, शिर्सेकर उभयतांमार्फत सत्यनारायण महापूजा करण्यात आली. सायंकाळी पंचवटी नाका ते अंबाडी पोलीस चौकी ते पंचवटी नाका अशी श्रींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सदर भव्य मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची सुंदर सजावट करून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत उमेळमान येथील आगरी समाज विकास शिक्षण संस्था उमेळमान लेझीम पथक व धूम्रवर्ण ढोलताशा पथक सहभागी झाले होते. मिरवणुकीत वसई-विरार शहर जिल्हाध्यक्ष राजन नाईक, माजी आमदार विलास तरे, शेखर धुरी, मनोज पाटील, मनोज बारोट, मुझफ्फर घन्सार, प्रज्ञा पाटील, राजू म्हात्रे, जोगेंद्रप्रसाद चौबे, महेंद्र पाटील, कपिल म्हात्रे, अश्विन सावरकर, ज्योतिश नंबियार, रितेश सत्यनाथ, विनोद कुमार, मयंक शेठ, गोपी मेनन, शिला अय्यर, कल्पेश चौव्हाण हे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
हनुमान प्रासादिक भजन मंडळ नवाळेचे भजन सम्राट दत्तात्रय बुवा वर्तक व सहकारी यांनी सुश्राव्य भजन संध्या सादर केली. भजनसंध्येनंतर नितीन रसाळ निर्मित गर्जतो महाराष्ट्र शिवबाचा हा पोवाडा सादर करण्यात आला. शाहीर नितीन रसाळ व सहकारी यांनी सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले होते. पोवड्यानंतर आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शिवजयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री शिवप्रहार प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष सिद्धेश तावडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष अभय कक्कड, जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट, प्रतिष्ठानचे पदाधिकारी बाळा सावंत, महेश सरवणकर, शेमल अजागिया, प्रणील गडा, सोहेल पंजवानी, रितिका, चेतन पागे, किरण पवार, अर्जुन इंगोले, भावेश गोवारी, बबन टिंगरे, अमोल गोरिवले, गोपाळ परब, ज्ञानेश्वर पवार, मनोज चोटालिया, राजेश चोटालिया, अंजली सोलंकी, गायत्री वेर्णेकर केतन गांधी, केदार कोळी, एबिन अब्राहन, अमित शिर्सेकर, शीतल शिर्सेकर आदी पदाधिकार्यांनी विशेष मेहनत घेतली.